'विप्रो' पुन्हा शेअर बायबॅक करणार? 

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 जानेवारी 2019

बेंगलुरूः भारतातील तिस-या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी 'विप्रो' पुन्हा 'शेअर बायबॅक' करण्याची शक्यता आहे.  विश्लेषकांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कंपनीकडून 'शेअर बायबॅक'संबंधी घोषणा होण्याची शक्यता आहे. कंपनीकडून पुन्हा सात हजार कोटींचे शेअर बायबॅक करण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी 'नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल' आणि शेअर बाजार नियामक मंडळाची मंजुरी आवश्यक आहे. 

विप्रोने यापूर्वीच 11 हजार कोटी रुपयांचे शेअर बायबॅक केले होते. बायबॅकच्या माध्यमातून सुमारे 34 कोटी शेअर 320 रुपये प्रतिशेअर प्रमाणे खरेदी करण्यात आले होते. 

आज मुंबई शेअर बाजारात विप्रोचा शेअर 325.55 रुपयांवर व्यवहार करत असून त्यात किरकोळ वाढ झाली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे 147,312.10 कोटींचे बाजारभांडवल आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wipro may opt for up to $1.2 billion share buyback