'विप्रो'चा शेअर तेजीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

भारतातील तिस-या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी 'विप्रो लिमिटेड'ला सप्टेंबर अखेर संपलेल्या तिमाहीत 2,192 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. सकारात्मक तिमाही निकालामुळे मुंबई शेअर बाजारात विप्रोचा शेअर सकाळच्या सत्रात 3 टक्क्यांनी वधारला. शेअरने आज इंट्राडे व्यवहारात 299.10 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली.

मुंबई: भारतातील तिस-या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या 'विप्रो लिमिटेड'ला सप्टेंबर अखेर संपलेल्या तिमाहीत 2,192 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. काल कंपनीने तिमाही निकाल जाहीर केले. सकारात्मक तिमाही निकालामुळे मुंबई शेअर बाजारात विप्रोचा शेअर सकाळच्या सत्रात 3 टक्क्यांनी वधारला आहे. शेअरने आज इंट्राडे व्यवहारात 299.10 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली.

गेल्यावर्षीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 6 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. विप्रोने यापूर्वीच 11 हजार कोटी रुपयांचे शेअर बायबॅक करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बायबॅकच्या माध्यमातून सुमारे 34 कोटी शेअर्स खरेदी करणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. कंपनी प्रतिशेअर 320 रुपये प्रमाणे शेअर बायबॅक करणार आहे.

आज मुंबई शेअर बाजारात विप्रोचा शेअर 295.45 रुपयांवर व्यवहार करत असून तो 5.95 रुपयांनी म्हणजे 2.06 टक्क्यांनी वधारला आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे 143,113.43 कोटींचे बाजारभांडवल आहे.

Web Title: Wipro shares gain over 3% after Sept quarter results