विप्रोच्या नफ्यात घसरण 

पीटीआय
गुरुवार, 26 एप्रिल 2018

नवी दिल्ली - कॉर्पोरेटमधील दिवाळखोरी आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील मंदीचा फटका माहिती आणि तंत्रज्ञान सेवा पुरवठादार विप्रोला बसला आहे. विप्रोला ३१ मार्च अखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत १ हजार ८०१ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत ६.७ टक्‍क्‍यांची घसरण झाली. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १ हजार ९०३ कोटींचा नफा झाला होता.  

आयटी सेवा निर्यातीतील तिसरी मोठी कंपनी असलेल्या विप्रोच्या महसुलात ०.७ टक्‍क्‍याची किरकोळ वाढ झाली. चौथ्या तिमाहीत कंपनीला १३ हजार ६६९ कोटींचा महसूल मिळाला आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत कंपनीला १३ हजार ४१२ कोटींचा महसूल मिळाला होता. विप्रोच्या दोन ग्राहक कंपन्या दिवाळखोरीत गेल्या आहेत. या दोन कंपन्यांकडून येणे बाकी असलेल्या १ हजार ४३७ कोटींची विप्रोला तरतूद करावी लागली आहे. डिसेंबरमध्ये कंपनीने समभाग पुनर्खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली होती. दूरसंचार सेवा क्षेत्रातील मंदीचाही व्यवसायावर परिणाम झाला आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा विचार करता कंपनीला ५४ हजार ४९० कोटींचा महसूल मिळाला असून, यात १ टक्‍क्‍याची घट झाली. निव्वळ नफ्यात ५.७ टक्‍क्‍याची घट झाली असून, ते ८ हजार १० कोटी रुपये मिळाले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Web Title: Wipro's profit fell