आता जिल्हा बँकेतून आठवड्यात काढा 24000 रुपये

वृत्तसंस्था
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये खाते असणारे नागरिक आता एका आठवड्यात 24 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतात. जिल्हा बँकांनी त्यांच्या ग्राहकांना 24 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या खात्यांमधून 24 हजार रुपये काढण्याची परवानगी द्यावी, असे निर्देश रिझर्व्ह बॅंकेने (RBI) दिले आहेत. याबाबतचे परिपत्रक RBI ने प्रसिद्ध केले आहे. 

तसेच, सर्व बँकांनाही याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची (DCCB) खाती ज्या बँकांमध्ये आहेत तिथून त्यांना आवश्यकतेनुसार पैसे काढण्याची परवानगी संबंधित बँकांनी द्यावी, असेही RBI ने म्हटले आहे. मात्र, आठवड्यातून 24 हजार रुपयेच रक्कम काढण्याची मर्यादा जिल्हा बँकांना इतर बँकांनी लागू करू नये असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

Web Title: Withdrawal of existing 500 and 1000 bank notes