
Government Scheme : महिलांना बचतीवर मिळणार ७.५ टक्के व्याज; फक्त एकदाच करा गुंतवणूक
मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) जाहीर केले होते. ही एक वेळची छोटी बचत योजना आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ही योजना आणण्यात आली आहे. ही योजना 2025 पर्यंत 2 वर्षांसाठी आहे. या योजनेत तुम्हाला बचतीवर ७.५ टक्के दराने परतावा मिळेल. यासोबतच अंशत: पैसे काढण्याचीही तरतूद आहे.
या योजनेची औपचारिक अधिसूचना लवकरच येणार आहे. 7.5 टक्के व्याजदरासह, ही योजना एका वर्षात 15,427 रुपये परतावा देईल. तुम्हाला या योजनेतून दोन वर्षांत 32,044 रुपयांचा परतावा मिळेल.
अशा प्रकारे, या योजनेत, तुमची 2 लाख रुपये दोन वर्षांत 2.32 लाख रुपये होईल. महिला सन्मान बचत प्रमाणपत्राशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया. (mahila samman savings certificate)
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 च्या अर्थसंकल्पात एकवेळ लघु बचत योजना जाहीर केली आहे. या योजनेचे नाव महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) आहे. ही योजना फक्त महिलांसाठी आहे.
कोण गुंतवणूक करू शकतो
महिला किंवा मुलीच्या नावाने महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये कोणीही गुंतवणूक करू शकते.
कमाल मर्यादा काय आहे
महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा रु. 2 लाख आहे. या योजनेत, गुंतवणूकदाराला 7.5 टक्के निश्चित व्याज दराने परतावा मिळतो.
एक-वेळ योजना
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक वेळची योजना आहे. ही योजना मार्च २०२५ पर्यंत दोन वर्षांसाठी उपलब्ध आहे.
विशेष फायदे काय आहेत
महिला सन्मान बचत प्रमाणपत्राची खास गोष्ट म्हणजे या योजनेला केंद्र सरकारचा पाठिंबा आहे. त्यामुळे ते पूर्णपणे सुरक्षित आहे. यासोबतच या योजनेत आंशिक पैसे काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
ही योजना करमुक्त आहे का ?
या योजनेतील गुंतवणूक करमुक्त असेल की नाही याबाबत अर्थमंत्र्यांनी कोणतीही स्पष्टता दिलेली नाही.