सरकारी बॅंकांना कामकाजाची सामायिक वेळ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांसाठी सामायिक वेळ निश्‍चित करण्यात आली आहे. गेल्या 1 नोव्हेंबरपासून सर्व सरकारी बॅंका कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत.

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांसाठी सामायिक वेळ निश्‍चित करण्यात आली आहे. गेल्या 1 नोव्हेंबरपासून सर्व सरकारी बॅंका कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत.

केंद्र शासनाच्या ईजनुसार बॅंकिंग सुधारणांर्तगत ग्राहकांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या कामकाजाची वेळ एकसमान करण्यात आली आहे. इंडियन बॅंक असोसिएशनने (आयबीए) बॅंकांच्या कामकाज वेळेसंदर्भात 6 ऑगस्ट 2019 रोजी काढलेल्या परिपत्रकात बॅंकांचे रहिवासी क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्र आणि अन्य बॅंकिंग अशा प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे.

नव्या वेळापत्रकानुसार, रहिवासी क्षेत्रातील बॅंकेची वेळ 9 ते 4; ग्राहकांसाठी सकाळी 9 ते दुपारी 3 असेल; तर व्यावसायिक क्षेत्रातील बॅंकेची वेळ 11 ते 6 ; ग्राहकांसाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 आणि अन्य क्षेत्रातील बॅंकांच्या कामकाजाची वेळ सकाळी 10 ते दुपारी 5 असेल. बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या संकेतस्थळावर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: working hours for government banks