बापरे... जगभरातील श्रीमंत गमावताय आपली संपत्ती... 

बापरे... जगभरातील श्रीमंत गमावताय आपली संपत्ती... 

नवी दिल्ली: जगातील सर्वाधिक श्रीमंत 500 व्यक्तींनी एकाच दिवसात त्यांच्या एकत्रित संपत्तीच्या 2.1 टक्के संपत्ती गमावली आहे. अमेरिकेच्या शेअर बाजारात यावर्षीच्या सर्वात मोठ्या घसरणीनंतर जगभरातील श्रीमंतांना मोठाच फटका बसला आहे. शेअर बाजारात गमावलेल्या या संपत्तीचे मूल्य 117 अब्ज डॉलर इतके प्रचंड आहे. अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्धाचा तडाखा अमेरिकी शेअर बाजाराला बसला आहे. 

अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोझ यांना शेअर बाजारातील घसरणीचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यांच्या संपत्तीत 3.4 अब्ज डॉलरची घट झाली आहे. अॅमेझॉनच्या शेअरच्या किंमतीत घसरण झाल्याचा त्यांना फटका बसला आहे. मात्र तरीही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताब अजूनही त्यांच्याकडेच आहे. त्यांच्या संपत्तीचे मूल्य 110 अब्ज डॉलर इतके आहे. मात्र आगामी काळात जेफ बेझोझ यांचे नुकसान भरून निघण्याची चिन्हे आहेत. कारण आतापर्यत त्यांच्या संपत्तीत सातत्याने वाढच होताना दिसली आहे.

 अमेरिकेतील श्रीमंतांव्यतिरिक्त हॉंगकॉंगमधील धनाढ्यांनादेखील याचा तडाखा बसला आहे. मागील काही आठवड्यांपासून तेथील शेअर बाजारात होत असलेल्या घसरणीमुळे तिथल्या श्रीमंतांच्या संपत्तीचेही मूल्य घसरले आहे. हॉंगकॉंग शेअर बाजारात नोंदणी केलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या टॉप टेन धनाढ्यांच्या संपत्तीत 23 जुलैनंतर 19 अब्ज डॉलर मूल्याची घट झाली आहे. अगदी कालच्या घसरणीनंतर 500 मोठ्या गुंतवणूकदारांनी जवळपास 5 लाख 40 हजार डॉलर मूल्याची संपत्ती गमावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com