शाओमीचा भारतातील दुसरा उत्पादन प्रकल्प आंध्रप्रदेशात सुरू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मार्च 2017

मुंबई: चीनी स्मार्टफोन कंपनी असलेल्या शाओमीने भारतात दुसरे उत्पादन केंद्र सुरू केले आहे. भारतातील आंध्रप्रदेशात फॉक्सकॉनसोबत भागीदारी करून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यामुळे पाच हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. शाओमीच्या उत्पादन केंद्रात 90 टक्के महिला कर्मचारी कार्य करतात. याआधी जुलै 2014 मध्ये कंपनीने पहिले उत्पादन केंद्र भारतात सुरू केले होते.

आता आंध्रप्रदेशात सुरू करण्यात आलेल्या नव्या उत्पादन केंद्रात मिनिटाला 1 स्मार्टफोन तयार होणार आहे. तसेच फॉक्सकॉन इतर व्हेंडर्सच्या मदतीने जुन्या मॉडेल्सचे उत्पादन करणार आहे.

''नव्या उत्पादन प्रकल्पामुळे शाओमीच्या युजर्सची 95 टक्के मागणी पूर्ण करू शकणार आहोत. मात्र इको सिस्टीम प्रॉडक्ट, प्रिमियम प्रॉडक्ट आणि अ्रॅक्सेसरीज चीनमधूनच आयात केले जाणार आहे. भारतीय स्मार्टफोन बाजारात शाओमीची 10.7 टक्के हिस्सेदारी आहे. कंपनीचा रेडीमी फोर हा स्मार्टफोन भारतातील याच प्रकल्पात तयार केला जाणार आहे. तसेच या फोनची रु.5999 किंमत जाहीर करण्यात आली आहे,'' अशी माहिती शाओमी इंडियाचे प्रमुख मनु जैन यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Xiaomi opens new phone plant in Andhra Pradesh