खोट्या मेसेजविरोधात येस बॅंकेची तक्रार 

सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या खोट्या मेसेजविरोधात येस बॅंकेने पोलिस आणि सायबर सेलकडे तक्रार केली आहे. बॅंक आर्थिक अडचणीत आल्याचा मेसेज खोटा असून, ठेवीदार आणि खातेदारांनी यावर विश्‍वास ठेवू नये.

मुंबई - सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या खोट्या मेसेजविरोधात येस बॅंकेने पोलिस आणि सायबर सेलकडे तक्रार केली आहे. बॅंक आर्थिक अडचणीत आल्याचा मेसेज खोटा असून, ठेवीदार आणि खातेदारांनी यावर विश्‍वास ठेवू नये. बॅंक आर्थिकदृष्ट्या भक्कम असून, त्यांच्या हिताचे रक्षण करण्यास कटिबद्ध असल्याचे येस बॅंकेने म्हटले आहे. 

येस बॅंकेच्या प्रवर्तकांनी बॅंकेच्या शेअर्सची विक्री केल्याने गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा फटका येस बॅंकेच्या शेअरला बसला. बॅंकेच्या शेअरमध्ये गेल्या आठवड्यात मोठी उलथापालथ दिसून आली. बॅंकेची आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याचा मेसेज समाज माध्यमांमध्ये वाऱ्यासारखा पसरल्याने बॅंकेच्या खातेदार आणि ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खोट्या मेसेजमुळे भांडवली बाजारात येस बॅंकेच्या शेअरमध्ये मोठी विक्री झाली. हा मेसेज खोटा असून, तो पसरवणाऱ्यांवर कारवाईसाठी अखेर येस बॅंकेच्या व्यवस्थापनाने पोलिसांत धाव घेतली आहे. बॅंकेने पोलिसांत आणि सायबर सेलकडे तक्रार केली असून, खोट्या मेसेजवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yes Bank complains against false messages