येस बँकेच्या खातेदारांना आणखी एक धक्का; आता...

वृत्तसंस्था
Saturday, 7 March 2020

रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातले

शाखांना पोलिस छावणीचे स्वरूप

मोबाईल ऍपही डाऊनलोड होत नाही

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातले आहेत. त्यानंतर खातेदार आणि ठेवीदारांचे पैसे काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, आता बँकेचे मोबाईल ऍप, डेबिट आणि क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि चेक क्लिअरिंगसह एटीएम सेवा पूर्णपणे ब्लॉक करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

येस बँकेच्या खातेदार आणि ठेवीदारांना महिनाभरात एकदाच 50 हजारांपर्यंत रक्कम काढता येईल, असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने लावले आहे. त्यानंतर बँक खातेदार आणि ठेवीदारांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे. तसेच आता गुगल पे, फोन पे सारखी इतर मोबाईल वॉलेट्सवरूनही व्यवहार करता येणार नाही.

शाखांना पोलिस छावणीचे स्वरूप

येस बँकेवर घातलेल्या निर्बंधानंतर शाखांना पोलिस छावणीचे स्वरूप आले असून, प्रत्येक शाखेबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Image result for yes bank

मोबाईल ऍपही डाऊनलोड हो नाहीये

येस बँकेचे मोबाईल ऍप डाऊनलोड होत नाही. त्यामुळे खातेदार मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. 

क्लिअरिंग सेवाही ठप्प

डिजिटल बँकिंग सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. तसेच चेक क्लिअरिंग सेवाही ठप्प झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yes Bank Digital Banking Services Collapse Customer Faces Problem To Transfer Cash