येस बँकेत खाते आहे? चिंता नको कारण...

वृत्तसंस्था
Sunday, 8 March 2020

- येस बँकेवर घातले भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्बंध.

नवी दिल्ली : येस बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे खातेदार आणि ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र, आता या सर्व येस बँकेच्या खातेदारांसाठी दिलासा देण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना 15 तासांच्या चौकशीनंतर सक्तवसुली संचालयनाकडून  अटक करण्यात आली. राणा कपूर यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी (पीएमएलए) अटक झाली. त्यांच्या अटकेनंतर बँकेच्या खातेदारांमध्ये आणखीन भीती निर्माण झाल्याचे चित्र आहे. मात्र, असे असताना आता बँकेने खातेदारांना मोठा दिलासा दिला आहे. येस बँकेच्या खातेधारकांना कुठल्याही बँकेच्या एटीएममधून रोख रक्कम काढता येणार आहे. या संदर्भात एक पत्रकच बँकेने प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार ही माहिती देण्यात आली आहे. 

Image result for yes bank

दरम्यान, बँकेच्या ठेवीदारांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी दिलासा दिला. ठेवीदारांचे सर्व पैसे सुरक्षित असल्याची ग्वाही देतानाच याप्रकरणी लवकरात लवकर तोडगा काढण्याचा आरबीआय प्रयत्न करत असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

Coronavirus : पुण्यात येतोय कोरोना? 229 जणांचे रिपोर्ट्स...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yes Bank Scam Bank Account Holders can withdrawn money from any ATM