
- सहकारी बँकांना फटका
मुंबई : खाजगी क्षेत्रातील अडचणीत आलेल्या येस बँकेने नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) आणि इंमिडीएट पेमेंट सर्व्हिस (आयएमपीएस) सेवा पुन्हा सुरु केल्या आहेत. तसेच खातेधारक अन्य खात्यांच्या माध्यमातून येस बॅकेच्या क्रेडिट कार्डची रक्कम आणि कर्जाची रक्कम फेडू शकणार आहे. बँकेने ट्विटच्या माध्यमातून सेवा सुरु असल्याची माहिती दिली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
बँकेने ट्विटमध्ये 'तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद' असे देखील म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेने नुकतेच येस बँकेवर आर्थिक निर्बंध आणले होते.खातेधारकांच्या रक्कम काढण्यावरही मर्यादा घालण्यात आल्या होत्या. खातेदारांना त्यांच्या खात्यातून फक्त 50 हजारांची रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली आहे.
तसेच इतर कोणत्याही बँकेच्या 'एटीएम'मधून पैसे काढून घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. बँकेवर असलेले विविध निर्बंध येत्या 3 एप्रिलपर्यंत दूर होतील, असे रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे. दरम्यान, आर्थिक अनियमिततेच्या कारणास्तव रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर 3 एप्रिलपर्यंत निर्बंध लादले आहेत.
सहकारी बँकांना फटका
येस बँकेवर रिझव्र्ह बँकेने घातलेल्या निर्बंधामुळे राज्यातील 109 सहकारी बँकांचे ‘ऑनलाईन’ व्यवहार देखील ठप्प झाले होते. आता मात्र सेवा पूर्वपदावर येत असल्याचे सांगितले जात आहे.