esakal | ... तर तुमचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड होणार बंद !
sakal

बोलून बातमी शोधा

Debit card

आरबीआयने 15 जानेवारीला डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या वापरासंबंधी नवीन नियमावली जाहीर केली आहे.

... तर तुमचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड होणार बंद !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ज्या ग्राहकांनी त्यांचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ऑनलाइन व्यवहारांसाठी एकदाही वापरलेले नाही ते कार्ड लवकरच ब्लॉक /बंद करण्यात येईल. डिजिटल व्यवहारांची सुरक्षा वाढवण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या वापरासंबंधी नवीन नियम जारी केले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आरबीआयने 15 जानेवारीला डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या वापरासंबंधी नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार,

1) ज्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून कधीही ऑनलाईन / कॉन्टॅक्टलेस व्यवहार झालेले नाहीत अशा कार्डवरील ऑनलाईन व्यवहारांची सुविधा 16 मार्चपासून काढून घेण्यात येणार आहे.

2) 16 मार्च 2020 पासून नव्याने इश्यू केल्या जाणाऱ्या कार्डवर फक्त एटीएम किंवा पीओएस मशीनवर केल्या जाणाऱ्या व्यवहारांचीच सुविधा असणार आहे.

3)  ज्या ग्राहकांना आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर ऑनलाईन व्यवहार, कॉन्टॅक्टलेस व्यवहार तसेच आंतरराष्ट्रीय व्यवहार करायचे आहेत त्यांना बँकेला स्वतंत्रपणे संपर्क साधून ही सुविधा आपल्या कार्डवर कार्यरत करता येईल.

4) वर्तमान परिस्थितीत ज्या ग्राहकांच्या कार्डवर सर्व सुविधा उपलब्ध आहेत त्यांना देखील वर नमूद केलेली सुविधा चालू ठेवण्याचा किंवा बंद करण्याचा पर्याय आहे. म्हणजेच ज्या ग्राहकांना आपल्या कार्डवरून आंतरराष्ट्रीय व्यवहारांची सुविधा बंद करायची आहे ते ग्राहक बँकेला संपर्क करू शकतात.

5) एटीएम मधून जास्तीत जास्त किती रक्कम काढली गेली पाहिजे यासंदर्भातील मर्यादा ठरविण्याचा ग्राहकाला पर्याय असणार आहे. तसेच, 24*7 त्यात कितीही वेळा बदल देखील करता येणार आहे. मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग, एटीएम मशीनवरील पर्यायांमधून, बँकेच्या कस्टमर सर्व्हिस क्रमांकावर फोन करून ही सुविधा वापरता येईल.

loading image