झोमॅटोसह या कंपन्यांचा येणार IPO; शेअर मार्केटवर सर्वांच्या नजरा!

शेअर मार्केटमध्ये पैसे कमावणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
Zomato
Zomato

नवी दिल्ली : झोमॅटो फुड डिलिव्हरी कंपनी आपल्या सर्वांना माहितीच आहे. आपण अनेकदा यावरुन ऑनलाइन अन्न पदार्थ मागवले असतील. लोकांच्या पसंतीस उतरलेल्या झोमॅटोनं आपल्या व्यवसायाचा आता चांगलाच विस्तार केला आहे. कंपनीचा लवकरच इनिशिअल पब्लिक ऑफरिंग शेअर (IPO) शेअर मार्केटमध्ये येणार आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे कमावणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे झोमॅटोचा IPO कधी बाजारात येईल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Zomato IPO coming in market all eyes on the stock market)

२०२०-२०२१ या आर्थिक वर्षात अनेक नवीन कंपन्या शेअर बाजारात नव्याने लिस्ट झाल्या आहेत. यांपैकी जून महिन्यात कोणत्या कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्ट होऊ शकतात त्याची संभाव्य यादी समोर आली आहे. यामध्ये झोमॅटो, श्याम मेटॅलिक्स, किम्स हॉस्पिटल, किम्स हॉस्पिटल, किम्स हॉस्पिटल, डोडला डेअरी, आरोहण फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपन्यांचा समावेश आहे.

Zomato
‘जीडीपी’ला येणार ‘अच्छे दिन’!

अशातच आता जून महिन्यात कोणत्या कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्ट होऊ शकतात त्याची संभाव्य यादी

१. झोमॅटो : आपण सर्वचजण झोमॅटोवरून विविध खाद्य पदार्थ कायमच मागवतो. हीच खाद्यपदार्थांची डिलेव्हरी करणारी कंपनी आता शेअर बाजारात लिस्ट होण्यास सज्ज झाली आहे. सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून झोमॅटोला IPO लिस्टिंगची परवानगी देण्यात आली आहे. झोमॅटो तब्बल ८२५० कोटींचा IPO बाजारात आणणार आहे. हा IPO याच महिन्यात येऊ शकतो. या IPO च्या माध्यमातून कंपनी ७५०० करोड रुपये फ्रेश इश्यूच्या माध्यमातून तर ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून ७५० कोटी रुपये उभी करणार आहे.

२. श्याम मेटॅलिक्स - कोलकातामधील श्याम मेटॅलिक्स या कंपनीला देखील सेबीतर्फे त्यांचा IPO आणण्याची परवानगी मिळाली आहे. IPO च्या माध्यमातून कंपनी ११०७ रुपये उभी करणार आहे. या कंपनीने IOP साठीची आवश्यक परवानगी फेब्रुवारी २०२१ मध्ये मागितली होती. श्याम मेटॅलिक्स ही बांधकामासाठी लागणाऱ्या स्टील किंवा लोखंडी शिगांवर थर्मो मेकॅनिक ट्रीटमेंट करण्याचं काम करते सोबतच विविध स्ट्रक्चरल प्रोडक्स देखील बनवते.

३. किम्स हॉस्पिटल - कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच कृष्णा हॉस्पिटलला शेअर मार्केटमध्ये लिस्टिंगची परवानगी देण्यात आली आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस या कंपनीला SEBI ने सदर परवानगी दिली आहे. सदर परवानगी मिळाल्यांनतर हेल्थकेअर संबंधित कंपनीचा हा IPO जून महिन्यात शेअर मार्केटवर लिस्ट होऊ शकतो. किम्स हॉस्पिटलचा IPO तब्बल ७०० कोटी रुपयांचा असणार आहे.

४. डोडला डेअरी - तेलंगणा मधील डेअरी प्रोडक्ट्स बनवणारी कंपनी जून माढिण्यत शेअर मार्केटमध्ये IPO च्या माध्यमातून लिस्ट होण्याची शक्यता आहे. डोडला डेअरीचा IPO हा तब्बल ८०० कोटींचा असणार आहे.

५ आरोहण फायनान्शियल सर्व्हिसेस - आरोहण फायनान्शियल सर्व्हिसेस ही एक NBFC म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस पुरवणारी कंपनी आहे. जून २०२१ मध्ये या कंपनीचा IPO लिस्ट होऊ शकतो. या IPO च्या माध्यमातून कंपनी तब्बल १८०० कोटी रुपये उभी करणार आहे.

Zomato
कोणत्या शेअर्समध्ये आज पैसे कमावण्याच्या संधी? जाणून घ्या

IPO म्हणजे काय ?

IPO ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे एखादी खासगी कंपनी सर्वसामान्यांना आपले समभाग म्हणजेच शेअर्स विकून ती सार्वजनिक होते. कंपनी आपले शेअर्स लोकांना विकते आणि त्या बदल्यात पैसे (भांडवल) जमा करते. ज्या कंपनीने आपले शेअर्स लोकांसमोर आणले आहेत त्यांना इश्यूअर म्हणून ओळखलं जातं. आयपीओनंतर कंपनीच्या समभागांची खरेदी खुल्या बाजारात सुरू होते. एकदा तुम्ही शेअर्स खरेदी केलेत तुम्ही कंपनीचे मालक होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com