esakal | आणि बाप्पा पावला
sakal

बोलून बातमी शोधा

Aani Bappa Pawala

आपल्या लाडक्या बाप्पाला अनेक विशषणे आहेत आणि आपल्या आयुष्यात बाप्पा त्या विशेषणांना सार्थकसुद्धा ठरत असतो. आपण बाप्पाला सुखकर्ता, दुःखहर्ता   या विशेषणांनी संबोधतो आणि याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी येत असतो. पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या आपल्याला सर्वांच्या मनात एक स्थान आहे.

आणि बाप्पा पावला

sakal_logo
By
रफिक पठाण

आपल्या लाडक्या बाप्पाला अनेक विशषणे आहेत आणि आपल्या आयुष्यात बाप्पा त्या विशेषणांना सार्थकसुद्धा ठरत असतो. आपण बाप्पाला सुखकर्ता, दुःखहर्ता   या विशेषणांनी संबोधतो आणि याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी येत असतो. पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या आपल्याला सर्वांच्या मनात एक स्थान आहे. पुण्यातील मानाच्या गणपतीनंतर सर्वात महत्वाचे स्थान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला देण्यात आले आहे. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी प्रत्येकवर्षी लाखो भाविक संपूर्ण जगातून मंदिराला भेट देत असतात. यामध्ये बाप्पाच्या भक्तीत जातपात, श्रीमंत-गरीब असा कोणताही भेद नाही सर्वांच्या मनात बाप्पाची भक्ती ही सारखीच. आणि बाप्पाचा सुद्धा सर्वाना मिळणारा अनुभव, प्रसाद हा सारखाच .

पुण्यातील एका नामांकित विद्यापीठात शिक्षण घेत असताना असाच दगडूशेठ बाप्पाचा असाच अनुभव मी घेतला. विद्यापीठमध्ये स्टुडिओच्या व्यवस्थापक पदासाठी मी एक महिन्यापूर्वी अर्ज केला होता. आणि एक महिन्यात कोणत्याही प्रकारचे त्याविषयी संभाषण झाले नव्हते. जवळजवळ आता त्या नोकरीची अपेक्षाच   मी सोडून दिली होती. पुणे पर्यटनावर तयार करण्यात येत असलेल्या एका वेबसिरीजसाठी मी माझ्या टीमसोबत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या चित्रीकरणासाठी मंदिरात गेलो होतो. याआधीसुद्धा बऱ्याचवेळा मी दगडूशेठ मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. सर्व शूट आटोपून आम्ही सर्वानी बाप्पाचे दर्शन घेण्याचं ठरवलं होतं. दगडूशेठ मंदिरात बाप्पाच्या मंदिरात गणपतीचे वाहन असलेले एक उंदीरमामा सुद्धा आहेत. ज्यांच्या कानात आपण आपले गाऱ्हाणे, आपल्या मागण्या बाप्पा पर्यंत पोहचवण्यासाठी सांगत असतो. आणि सहजच मी उंदीरमामांच्या कानात माझ्या नोकरीची गोष्ट सांगितली आणि मंदिरात जाऊन बसलो.

आणि बाप्पा पावला:

मंदिरात बसताच क्षणी मला एका लँडलाईन क्रमांकावरून कॉल आला.  तो कॉलसेंटरचा असेल असं समझून मी कट केला. मला पुन्हा त्याच नंबरवरून कॉल आल्यावर मी मंदिराबाहेर येऊन तो कॉल उचलला, आणि तिकडून हॅलो नंतर लगेचच तुमची स्टुडिओ व्यवस्थापक पदासाठी निवड झाली असं मला सांगण्यात आलं. मला या गोष्टीवर विश्वासच बसला  नाही म्हणून मी पुन्हा एकदा त्यांच्याकडून सर्व तपासून घेतलं होत आणि खरोखर माझी त्या पदावर निवड झाली होती.

एक महिना कुठल्याही प्रकारचा संपर्क केला नसताना अचानक नोकरी मिळाल्याचा आनंद मला खूप भारावून टाकणारा होता. मी याला बाप्पाचा प्रसाद म्हणून स्वीकार केला आणि याप्रकारे मला बाप्पा पावला.

(यामधून  कुठल्याही प्रकारे अंधश्रद्धेचा प्रचार करण्याचा आमचा हेतू नाही)