β मिशन 'ऍडमिशन प्लेग्रुप'...!

β मिशन 'ऍडमिशन प्लेग्रुप'...!

केवळ 10 ते 15 मिनिटांच्या या भेटीसाठी किंवा मुलाखतीसाठी पालकांना अख्खा दिवस सुट्टी काढावी लागते. विशेषत: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांना वारंवार अशा पद्धतीची सुट्टी मिळेलच असे नाही. 

सध्याच्या काळात मुलांना शाळेत प्रवेश मिळणे म्हणजे एक दिव्यच काम झाले आहे. विविध शाळांच्या विविध मागण्या आणि नियम. कुणी डिसेंबर, जानेवारीत प्रवेश प्रक्रिया सुरू करतात तर कुणी जूनपासून सुरू करतात. अनेक ठिकाणी आता ऑनलाइन जाहिरात तसेच प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली जाते त्यामुळे पालकांना कायम संबंधित शाळेच्या संकेतस्थळावर जाऊन बसावे लागते. शाळेचा प्रवेश अर्ज मिळाला की लगेचच तो दुसऱ्या दिवशी अमुक एका वेळेपर्यंतच तो स्वीकारला जाईल असे सांगितले जाते. त्यामुळे संबंधित वेळेत पोचण्यासाठीही पालकांना कसरत करावी लागते. त्यानंतर आता आपला अर्ज तर शाळेत पोचला असे म्हणत असतानाच लगेचच तुम्हाला अमुक तारखेला अमुक वेळेत "स्कूल व्हिझिट‘साठी यावे लागेल असा निरोप येतो.
 
त्यानंतर तेथे पालकांची माहिती घेतली जाते तसेच आपला पाल्य इतरांमध्ये मिसळतो किंवा एकटाच खेळतो याचे निरीक्षण करण्यात येते. त्याचवेळी पालकांची संपूर्ण माहिती घेतली जाते ती सुद्धा 10 ते 15 मिनिटांमध्ये. मात्र या व्हिझिटसाठी आई आणि वडील दोघांनाही बोलविले जाते. या भेटीची वेळ कधी सकाळी तर कधी दुपारी असते. त्यामुळे केवळ 10 ते 15 मिनिटांच्या या भेटीसाठी किंवा मुलाखतीसाठी पालकांना अख्खा दिवस सुट्टी काढावी लागते. विशेषत: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांना वारंवार अशा पद्धतीची सुट्टी मिळेलच असे नाही. 

त्याचप्रमाणे या भेटीतून फार काही निष्पन्न होत नाही. परंतु अनिश्‍चितता कायम राहते. कारण यादी केव्हा प्रसिद्ध होईल हे गुलदस्त्यात ठेवले जाते. तुम्हाला शाळेचे पत्र येईल किंवा मोबाईल येईल असे सांगितले जाते. त्यामुळे पालक पुन्हा संभ्रमावस्थतेत जातात; कित्येक जण देव पाण्यात ठेवून बसतात. काही जण चातकासारखी पोस्टमनची किंवा कुरियर वाल्याची वाट पाहतात तर काहींना मोबाईल वाजल्यावर छातीत धस्स होते आणि कोठून तो आला याचे तर्कवितर्क आधी तो सुरू करतो. काही जण सतत मेसेज वाचण्यात मग्न होतात. कारण आपला नंबर लागला काय याची उत्सुकता प्रत्येकालाच असते.

शाळेत काही विचारतील म्हणून अनेक जण तयारी करून आलेले असतात. अनेक जण रिस्पेशनवरच विविध प्रश्‍न विचारत असतात. त्यातून आपल्याला काही माहिती मिळते काय याचा अंदाजही ते घेत असतात. त्यातच डोळ्यापुढे उभी राहते ती शाळेची अवाढव्य फी, स्कूल व्हॅन आणि युनिफॉर्म, बूट, मोजे यांचा खर्च. शाळेत प्रवेश मिळणार म्हटल्यावर म्हणजे थोडी फी भरल्यावर शोध सुरू होतो तो स्कूल व्हॅनचा. आपल्या भागात कोणता स्कूल व्हॅनवाला येतो त्याचा खर्च काय त्यात किती मुले असतात याबाबत चर्चा सुरू होते... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com