कोहली, प्लिज पुजाराला गमवू नको

269895-cheteshwar-pujara.jpg269895-cheteshwar-pujara.jpg
269895-cheteshwar-pujara.jpg269895-cheteshwar-pujara.jpg

गुरुवारचा पहिला दिवस पावसाने धुतला गेल्यावर लॉर्डस कसोटी सामन्याला दुसर्‍या दिवशी एकदम वेळेवर सुरुवात झाली. ज्यो रूटने सलग दुसर्‍यांदा नाणेफेक जिंकली. फरक इतकाच होता, की पहिल्या कसोटीत प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतलेल्या ज्यो रूटने लॉर्डस कसोटीत प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. दिवसभर लॉर्डस मैदानावर पावसाने आणि खेळ चालू असताना स्वींग गोलंदाजीने हजेरी लावली. अँडरसन - वोकस् जोडीने भारतीय फलंदाजांना आपल्या स्वींग गोलंदाजीच्या तालावर नाचवले. एकूण ३५.२ षटकांच्या खेळात कर्णधाराचा गोलंदाजी करायचा निर्णय किती योग्य होता हे कळून चुकले. दुसर्‍या दिवशीचा खेळ थांबला असताना भारतीय संघाचा पहिला डाव १०७ धावांमधे गुंडाळण्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना यश आले.

भारतीय संघ व्यस्थापनाने अपेक्षेप्रमाणे चेतेश्वर पुजाराला संघात स्थान मिळाले. मात्र, या सामन्यात चेतेश्वर पुजारा फक्त एक रन काढून धावबाद झाला. पुजारा गेल्या दोन वर्षांत कसोटीत पाचव्यांदा धावबाद झाला असून खेळपट्टीवर पळताना पुजाराकडून अक्षम्य हलगर्जीपणा होत असल्याची टीका होत आहे. चेतेश्वर पुजारा हा चपळ खेळाडू नाही. संघ व्यवस्थापनाने पुजाराला वेगाने धावा पळण्यावरून धारेवर धरले. पुजाराने प्रयत्नपूर्वक वजन कमी करून पळण्याचा वेग वाढवला. फक्त सतत रनिंग बिटविन द विकेट्सचा विषय मनात घोळत असल्याने शक्य नसलेल्या धावा पळताना पुजारा दक्षिण आफ्रिकेतील एका कसोटी सामन्यातील दोन्ही डावांत धावबाद झाला. पुजाराला धावा पळण्याच्या तंत्रावरून दडपणाखाली टाकण्यापेक्षा त्याच्या चिवट फलंदाजीचा वापर करून घेणे संघ व्यवस्थापनाला जमायला पाहिजे. या सामन्यात पुजाराकडून क्रिकेटप्रेमींना अपेक्षाही होत्या. पण शुक्रवारी त्यांचा हिरमोड झाला. चेतेश्वर पुजारा २५ चेंडूत फक्त १ रन करुन माघारी परतला. रन काढताना कोहली आणि पुजाराचा गोंधळ उडाला. यात कोहलीही कारणीभूत असला तरी शेवटी पुजारा बाद झाला. गेल्या दोन वर्षात कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे फलंदाज सात वेळा धावबाद झाले. यातील पाच वेळा धावबाद होण्याचा विक्रम पुजाराच्या नावावर जमा झाला आहे.

आपण पुजाराच्या आतापर्यंतच्या कामगिरीकडे लक्ष दिल्यास आपल्याला लक्षात येईल पुजारा संघासाठी किती महत्त्वाचा खेळाडू आहे. पुजाराने कसोटीमध्ये खेळण्यास सुरुवात केल्यापासून आतापर्यंत भारताने ८१ कसोटी सामने खळले आहेत. यापैकी भारताने ३९ कसोटीमध्ये विजय आणि २२ कसोटीत पराभवाला सामोर जावे लागलेय. तर २० कसोटी अनिर्णीत राखल्या आहेत. यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ८१ कसोटीतील ५८ सामन्यात पुजाराने भारतीय संघात होता. यापैकी भारताने ३३ मध्ये विजय तर १२ मध्ये पराभव पाहिला आहे. १३ अनिर्णित राहिल्यात. म्हणजेच पुजारा भारतीय संघात असताना भारतीय संघाची कामगिरी नेहमीच उजवी झाली आहे. ज्या २३ सामन्यात भारत पुजाराशिवाय खेळला आहे. त्यात भारताला फक्त सहा सामन्यात विजय मिळवता आला, तर १० मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

आकडे समोर असतानाही आपण त्याला वेगाने धावा पळण्यावरून धारेवर धरले. पुजाराने प्रयत्नपूर्वक वजन कमी करून पळण्याचा वेग वाढवला. फक्त सतत रनिंग बिटविन द विकेट्सचा विषय मनात घोळत असल्याने शक्य नसलेल्या धावा पळताना पुजारा गेल्या दोन वर्षात पाच वेळा धावबाद झाला आहे. काल तो धावबाद झाला त्यात विराट कोहलीची चूक होती हे मान्य करायला हवे. हे कर्णधार म्हणून विराट कोहलीला माहित असताना शक्य नसलेली धाव घेण्यासाठी भाग पडून त्याला धावबाद केले आणि संघाला संकटात टाकले. पुढे काय हे झाले आपण पहिले. यातून विराट कोहलीनेच पुजारची गेम केली म्हणायला वाव आहे. खरं तर कसोटी सामन्यांमध्ये वेगाने पळून नाही तर चिवट फलंदाजी करत चेंडूच्या योग्यतेनुसार खेळून धावा काढायच्या असतात. पुजाराला धावा पळण्याच्या तंत्रावरून दडपणाखाली टाकण्यापेक्षा त्याच्या चिवट फलंदाजीचा वापर करून घेणे संघ व्यवस्थापनाला जमायला पाहिजे. अन्यथा आपला इंग्लंड दौरा आणखी संकटात सापडेल. यामुळे पुजारा सारखा चांगला खेळाडू गमावण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com