दी लेसर ऑफ टू इव्हिल्स..!

दी लेसर ऑफ टू इव्हिल्स..!

नोंव्हेबर 8 रोजी होणारी अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांना दर्शविण्यात आलेल्या नापसंतीची टक्केवारी 61% आहे; तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांच्या नापसंतीची टक्केवारी 52% आहे. निवडणूक इतक्‍या जवळ आली असताना दोघाही उमेदवारांच्या नापसंतीची एवढी उच्च टक्केवारी ही ऐतिहासिक टक्केवारी म्हनावी लागेल. याचा अर्थ बरेच नागरिक अजूनही कोणाला निवडून द्यावे,यासंबंधी बुचकळ्यात पडलेले आहेत. 

क्‍लिंटन यांचा त्राजकीय प्रवास 1979 साली अर्कांसा राज्याची "फर्स्ट लेडी' म्हणजेच तत्कालीन गव्हर्नर बिल क्‍लिंटन यांच्या पत्नी या नात्याने सुरु झाला. त्यादरम्यान क्‍लिंटन यांनी 1 हजार डॉलर्सची गुंतवणूक केली आणि वर्षाच्या आत 1 लाख डॉलर्सचा फायदा मिळविला. ह्लिंटन याअंच्या विरोधकांच्या डोळ्यांत हे भरले आणि त्या गुंतवणुकीविषयी अनेक प्रश्‍न निर्माण होऊ लागले. त्यावेळेपासून क्‍लिंटन हे वादाच्या भोवऱ्यात सापडू लागले. सुप्रसिद्ध येल विद्यापीठामधून वकिलीची पदवी मिळविलेल्या हिलरी या घरी बसून राहण्यामधल्या नव्हत्याच. बिल हे गव्हर्नर असताना त्या राज्यामधील शिक्षण पद्धतीत चांगले फेरफार करण्यामध्ये त्या कार्यमग्न झाल्या. तेव्हापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. स्त्री हक्क, लहान मुलांची साक्षरता या मुद्यांत त्यांनी लक्ष घालणे सुरु केले. त्यांच्या या भूमिका उदारमतवादी होत्या. यामुळे प्राप्तिकर वाढवावा लागेल. असे म्हणून पुराणमतवादी रिपब्लिकन पक्षाने या भूमिकांस व धोरणांस विरोध करण्यास सुरुवात केली. बिल हे अध्यक्ष झाल्यानंतर हिलरींनी फर्स्ट लेडी या भूमिकेमधून सर्व अमेरिकन नागरिकांना परवडणारा हेल्थ इन्शुरन्स सध्य करण्याचे कार्य हाती घेतले. या धोरणास रिपब्लिकन पक्षाने आर्थिकदृष्टया खर्चिक आहे, असे म्हणत जबरदस्त विरोध केला आणि आजही तो विरोध कायम आहे. 

पुढे हिलरी या न्यूयॉर्क राज्याच्या सिनेटर आणि नंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंय्त्री बनल्या. परराष्ट्र मंत्री असत्ताना, 2012 मध्ये लीबियातील बेंगाझी येथील अमेरिकन वकिलातीवर आत्मघातकी हल्ला. या हल्ल्यात अमेरिकन राजदूत आणि तीन कर्मचारी मृत्युमुखी पडले. हिलरी यांनी परराष्ट्र मंत्री या नात्याने या वकिलातीस पुरेसे संरक्षण देण्याची तरतूद केली नाही, असा आरोप रिपब्लिकन पक्षाकडून करण्यात आला. संसदेमध्ये हिलरी यांच्या झालेल्या चौकशीमध्ये त्यांची काहीही चूक नसल्याचे स्पष्ट झाले. हिलरी या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री असताना सरकारी कामकाजार्थ इ-मेल वापरण्याकरिता त्यांनी स्वत:च्या घरी खासगी "सर्व्हर' ठेवला. परराष्ट्र मंत्रालयाचा सर्व्हर न वापरता हिलरी यांनी स्वत:च्या घरी खासगी सर्व्हर का बसवून घेतला. अशी विचारणा रिपब्लिकन पक्षासहित हिलरी यांच्या विरोधकांनी केली. हिलरीसंदर्भात विरोधकांकडून अविश्‍वासही व्यक्त करण्यात आला. मात्र यामध्ये लपविण्यासारखे काही नसून याआधीचे परराष्ट्र मंत्री कोंडोलिझा राईस आणि कॉलिन पॉवेल यांनीदेखील असेच केले असल्याचे सांगत हिलरी यांनी या निर्णयाचे समर्थन केले. 

त्र रिपब्लिकन पक्षाने हिलरी यांच्या धोरणांवर वारंवार हल्ला करत, हिलरी यांच्यामध्ये उणीवा आहेत, अशी भूमिका घेत त्यांना राजकीय खलनायिका ह्बनविण्याचा प्रयत्न केला. यामुळेच हिलरी यांच्याविषयी लोकमत नकारार्थी होऊ लागेल. याच कारणास्तव आज काही नागरिक हिलरी यांना विकृत समजतात. 

सत्तर वर्षीय ट्रम्प यांना राजकीय अनुभव काहीच नाही. ट्रम्प यांनी 1971 साली त्यांच्या वडिलांच्या बांधकाम व्यवसायाची सूत्रे हाती घेतली आणि न्यूयॉर्कमधील बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योपती अशी ख्याती मिळविली. ट्रम्प यांनी नंतर हॉटेल व कॅसिनोच्या धंद्यात गुंतवणुकी केल्या, गोल्फ कोर्सेस विकत घेतली. याचबरोबर ट्रम्प एअरलाईन व रिअल इस्टेट मधील खरेदी/विक्री कशी करावी, हे शिकविण्याकरिता ट्रम्प विद्यापीठाचीही स्थापना केली. 2004 ते 2015 मध्ये ट्रम्प यांनी ऍप्रेंटिस नावाचा रिऍलिटी टीव्ही शो केला. याशिवाय 1996 ते 2015 या काळात ट्रम्प यांनी मिस युनिव्हर्स, मिस युएसए, मिस टिन युएसए अशा सौंदर्य स्पर्धांमध्ये व्यावसायिक भागीदारी करत मनोरंजन क्षेत्रातही नाव कमावले. ट्रम्प यांना जसे यश मिळाले; तसे बरेच अपयशही त्यांच्या पदरी पडले. ट्रम्प कॅसिनोज तोट्यात गेल्यामुळे बंद करावे लागले, ट्रम्प एअर लाईनही केवळ चार वर्षांतच संपुष्टात आली. ट्रम्प विद्यापीठ स्थापनेनंतर अवघ्या पाच वर्षांत बंद करावे लागले.ट्रम्प यांच्यावर या बाबतीत फसवणूक केल्याचे खटले सुरु आहेत. याखेरीज मॉर्टगेज, मासिक वगैरे जोडधंद्यांसहच एकूण दहा धंद्यांना ट्रम्प यांना मुकावे लागले. ट्रम्प यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात आवाक्‍याबाहेर गुंतवणुकी केल्या. 1990 च्याअ दशकांत रिअल इस्टेटच्या किंमती ढासळल्यानंतर ट्रम्प यांचे 916 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले. मात्र त्यांनी दिवाळखोरीच्या कायदेशीर करसुटीच्या तरतुदीचा फायदा उठवून त्या नुकसानाच्या मोबदल्यात गेली दोन दशके कर देणे टाळले असल्याचे म्हटले जात आहे. आणि आता ते टॅक्‍स रिटर्न्स दाखवत नाहीत. हिलरी व डेमोक्रॅटिक पक्षाने ट्रम्प यांच्या या अपयशाचा व करबुडवेपणाचा गाजावाजा करुन ट्रम्प हे आव आणतात तितके ते उद्योगधंद्यात तरबेज व दक्ष नाहीत, असे दाखवून दिले आहे. याचबरोबर अमेरिकेच्या आर्थिक सज्मस्या दूर करण्यात हिलरींपेक्षा मीच जास्त समर्थ आहे, असा ट्रम्प यांचा दावाही या विरोधकांनी हाणून पाडला आहे. 

त्याचप्रमाणे मेक्‍सिको, दक्षिण अमेरिकेतून आलेल्या स्थलांतरितांविरोधात वंशविद्‌वेषी वक्‍तव्येसुद्‌धा ट्‌म्प यांना बरीच भोवली आहेत. गेल्या तीन दशकाम्त ट्‍रम्प यांनी असभ्य वर्तणूक केल्याचा आरोप नऊ महिलांनी केला आहे. ""ट्रम्प यांना देशांतर्गत वा आंतरराष्ट्रीय कारभाराचा काडीचाही गंध नाही. त्यांचे अमर्यादाशील वागणे धोकादायक आहे आणि ते अमेरिकेस मोडकळीस आणतील. तेव्हा त्यांना अध्यक्षपदापासून दूर ठेवावी,' असे आवाहन हिलरी व डेमोक्रॅटिक पक्षाकडून सतत करण्यात येत आहे. 

कोणत्याही गोष्टींमधून नकारार्थी अर्थ काढण्यासाठी सध्या दोन्ही पक्ष कार्यान्वित आहेत. दोन्ही उमेदवारांमधील कमतरता आणि तुलना लोकांसमोर मांडली जात आहे. आणि काही मतदारांना कोठल्या "लेसर ऑफ टू इव्हिल्स'ला निवडून द्यावे हा प्रश्‍न भेडसावत आहे. अमेरिकेत बुधवारी रात्री होणाऱ्या डिबेटमध्ये ट्रम्प वा हिलरी यांना निणायक विजय मिळविता आला नाही; तर हा अल्प मतदार गटचच नोव्हेंबर 8 रोजी होणाऱ्या सार्वजनिक निवडणुकीत निर्णायक ठरु शकेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com