ग्लॅमर जगताचा काळा चेहरा

nana tanu
nana tanu

तनुश्री दत्ता यांनी अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर केलेले आरोप, त्यानंतर कंगना राणावत यांनी विकास बहलवर, दोन महिला पत्रकारांनी कैलाश खेर यांच्यावर गैरवर्तनाचे आणि तारा या दूरदर्शनवरील मालिकेच्या निर्मात्या विनिता नंदा यांनी तर सिनेमा, दूरदर्शनमध्ये संस्कारी व्यक्‍तीची भूमिका करणाऱ्या एका अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप केला आहे, कंगना राणावत ने बहल यांच्यावर केलेल्या आरोपानंतर आता तिच्यासोबतची सहकलाकार नयनी दिक्षीत पुढे आली असून तिने देखील बहल वर अशाच प्रकारचे गैरवर्तणूकीचे आरोप केले आहेत. तसेच अन्य एका महिलेने चेतन भगत यांच्यावर केलेले आरोपातील गांभीर्य बघितले तर सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना जो त्रास सोसावा लागत आहे, पुरूषी अत्याचार सहन करावा लागत आहे त्याची कल्पना येते. आपल्या देशात परंपरागत चालत आलेल्या पुरूषप्रधान संस्कृतीचा प्रभाव इतक्‍या सहजपणे दूर होणे शक्‍य नाही, पण पुरूषांनी केलेल्या अत्याचाराबाबत या महिलांनी बोलण्याचे जे धाडस केले आहे ते कौतुकास्पद आणि प्रेरक आहे. चेतन भगत ने मागितलेली माफी या महिलांच्या आरोपातील सत्यतेवर शिक्‍कामोर्तब करणारी आहे.

आता इथे स्त्री-पुरूष समानतेवर बोलणारे कुठे आहेत? सरकारने जो शासकीय कार्यालयात वा अन्य ठिकाणी महिलांवर अशा लैंगिक अत्याचार करणाऱ्यांवर कारवाईसाठी नेमलेल्या समित्या कुठे आहेत? महिलांसाठी, त्यांच्या हक्‍कांसाठी लढणाऱ्या संघटना मूग गिळून गप्प का आहेत? या घटना ज्या क्षेत्रात घडल्या आहेत ती प्रसिध्दीची क्षेत्र आहेत, सिनेमा हे क्षेत्र लोकप्रिय आहे, ते जेवढे प्रतिष्ठेचे समजले जाते तेवढे ते बदनाम देखील केले जात असते. मात्र आता याच क्षेत्रातील महिलांनी चक्‍क त्या क्षेत्रातील अंदाधुंदीबद्यल वाचा फोडल्याने या भूतलावावरील समाजाने खरोखरच त्या महिलांवर अत्याचार होत असतील तर त्यांच्यासाठी एकत्र आले पाहिजे. कधी-कधी महिलांच पुरूषांना आपल्या जाळ्यात ओढतात म्हणूनही ओरड केली जाते, मग यासाठी काही महिलांचाचा आधार घेऊन ही पुरूषमंडळी आपल्या सोयीनुसार त्यांना बदनाम करीत असते. यावेळी तर चक्‍क माध्यम क्षेत्रातील महिलांनी हा अन्यायाचा पाढा वाचल्यामुळे ऐषोआरामात, आणि धनाढ्यविश्‍वात रमणाऱ्या या लोकांचा मूळ काळा चेहरा पुढे आला आहे. ज्या महिला बिचाऱ्या खरोखरच मजबूर आहेत व तोंडातून अशा अत्याचाराविरूध्द ब्र देखील काढू शकत नाहीत त्यांच्यासाठी धीर देणारी ही वाच्यता आहे.यासाठी निर्माती विनीता नंदा, तनुश्री दत्ता, कंगना रानावत या अभिनेत्रींचे कौतुक करण्याची घाई करण्यापेक्षा त्यांनी जी आकर्षक चेहऱ्याआड वळवळणारी विकृत प्रवृत्ती आहे ती जगासामोर आणल्याबद्यल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत, जेणेकरून आणखी काही महिला ज्या अशा प्रकारच्या अत्याचाराला बळी पडत आहेत त्या पुढे येतील किंबहुना त्यांनी अशा महिला, तरूणींना पुढे येण्याचे केलेले आवाहन देखील योग्य आहे.

हा प्रकार आजच उघड झाला असे नव्हे, यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत आणि त्या विस्मृतीत ढकलल्या गेल्या आहेत. समस्त जगतात महिलांवर पुरूषांनी अशा विकृत पध्दतीने अत्याचार करण्याच्या घटना नव्या नाहीत, अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रिगन यांच्यावर तर व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्यासमवेत काम करणाऱ्या मोनिका लेवेन्सकी या महिलेने अशा प्रकारच्या लैंगिक अत्याचाराचे आरोप करून खळबळ उडवून दिली होती.

स्त्री-पुरूष, महिला समानतेवर बोलण्यापेक्षा विधायक कृती प्रामाणिकपणे होत गेली तर अशा घटनांना, एकमेकांकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात नक्‍कीच सकारात्मक बदल होत असतात पण केवळ महिलेकडे भोगाची वस्तू म्हणून बघण्याच्या पुरूषी विकृतीतून असे प्रकार होत असतात, बॉलिवूडमधील या महिलांनी चक्‍क काही आजच्या काळात आदर्श व्यक्‍ती म्हणून लोकप्रिय झालेल्या लोकांनाच उघडे पाडले हे बरे झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com