My Newspaper Vendor : गजाननन कांबळे यांना मिळाली वृत्तपत्र वितरणातून रोजगारांची संधी

My Newspaper Vendor Gajanan Kamble Article By Santosh Thorhate
My Newspaper Vendor Gajanan Kamble Article By Santosh Thorhate

संघर्ष की राहों मे कठिनाइयां तो आऐंगी
जीवन का सच यही हमें बतायेंगी,
बढाते रहना कदम सब कुछ सहते हुए
एक दिन ये जिंदगी खुशियों से सज जाएगी

वरील काव्य पंगती जीवनाचे सार सांगण्यासाठी पुरेशा आहे. आयुष्यात जो कष्ट करतो, संघर्षाला सामोरे जातो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ उमगतो... जीवनाकडे आपण किती सकारात्मक दृष्टीने बघतो याला विशेष महत्व आहे. प्रतिकूल परिस्थितीचे भांडवल न करता परिश्रम करण्याची जो तयारी ठेवतो त्याला आयुष्यात यश मिळते. हिवरा आश्रम येथील गजानन कांबळे यांनी वृत्तपत्र वितरणाच्या कामातून रोजगारांची संधी शोधली.

सकाळच्या रम्य व कोवळया सुर्य किरणांच्या प्रकाशात खुर्चीवर चहाचा घोट पित पित वृत्तपत्रांचे वाचन करण्याची सयम आपल्यापैकी अनेकांना निश्चित असले. सकाळी सकाळी वृत्तपत्र वाचणातून मिळाणारा वैचारीक आनंद व मौज काही औरच आहे. आपल्या वृत्रपत्र वाचनातून चालू घडामोडी सोबतच आपल्या ज्ञानाच्या कक्षा वृध्दींगत होतात. 15 ऑक्टोबर हा वृत्तपत्र विक्रता दिन म्हणून ओळखला जातो. लहानपणी वृत्तपत्र विक्री करीत शिक्षण घेवून वृत्तपत्र विक्रेता ते भारतीय महान शास्त्री ते भारताचे राष्ट्रपती असा अदभूत प्रवास करणारे भारताचे राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम यांना जन्मदिन वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा करण्यात येता. हेच वृत्रपत्र वाचकांच्या हाती पोहचविण्याचे महाराष्ट्रातील लाखो वृत्तपत्र विक्रेता व वितरणक करीत असतात.

हिवरा आश्रम येथे वृत्तपत्र वितरणाचा शिवधनुष्य गेल्या तीन ते चार वर्षापासून पेलण्याचे काम गजानन काशिनाथ कांबळे हे करीत आहे. शांत, सुस्वभावी, मनमिळाऊ व कठोर परिश्रमाचा गुण अंगी असलेला भला माणूस... हिवरा आश्रम सारख्या खेडयातील वाचकांच्या वाचनात खंड पडू नये म्हणून भल्या सकाळीच उठून बस मधून वृत्तपत्रांचे पार्सलांची वर्गवारी करून ते वाचकांच्या घरी नियोजित वेळेत पोहचविण्याच्या कामात कुठलीही हयगय करीत नाही. गजानन काशिनाथ कांबळे यांच्या घरीची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी वृत्तपत्र वितरणाचे काम स्वीकारले.

गजानन कांबळे यांना वृत्तपत्र वितरणातून रोजगारी संधी उपलब्ध झाली आहे. गजानन कांबळे यांना वृत्तपत्र वितरणातून तीन ते चार हजार रूपये मिळतात. याशिवाय माहेवारी मेस सुध्दा चालविता...हिवरा आश्रम येथील पेपर एजन्सी मालकांची पहिली पसंती गजानन कांबळे आहेत. गजानन कांबळे देशोन्नती,सकाळ,दिव्य मराठी,पुण्यनगरी,तरूण भारत या वृत्तपत्राचे वितरण करतात. गजानन कांबळे दररोज जवळपास चारशे वृत्तपत्रांचे वितरण करतात.

नियमीतपणे वाचकांपर्यंत वृत्तपत्र वितरण करणे ही एक महत्वाची जबाबदारी आहे. आपल्या जबाबदारीमध्ये कुठलाही खंड पडून नये यांची मी काळजी घेतो. काम कोणतेही असो ते श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. तुम्ही करीत असलेले काम किती प्रामाणिकपणे व जबाबदारीने करता याला महत्व आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com