बस इसकी जिंदगी सुधर जाये...

Mumbai
Mumbai

शेतकरी मोर्चासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या गर्दीत बहुधा तीच सर्वात छोटी मुलगी असावी... तिची मस्ती सुरुच होती पण तिचे आईवडिल थोडे चिंतेत दिसत होते. वारंवार तिला मांडीवर घेऊन काही तपासून पहात होते. कळलं की तिला मच्छर चावले होते खूप, तेच पहात होते ते. मुक्ताईनगरहून आलेलं हे कुटुंब मजल दरमजल करत ठाण्याच्या आनंदनगर चेकनाक्याजवळ इतर सगळ्या शेतकरी कुटुंबांबरोबर थांबलं होतं. ठाण्यापासून आझाद मैदानापर्यंत हे सारे शेतकरी पायी चालत जाणार होते...

इतका त्रास सहन करून, इतक्या छोट्या मुलीला घेऊन या मोर्चाला यावसं का वाटलं तुम्हाला, असं विचारल्यावर `पेटके वास्ते आनाही पडता, मजबूरी है...` असं सहजपणे सांगून टाकलं त्या मुलीच्या आईने. इकडे येऊन काही चांगलं होईल अशी आशा होती त्यांच्या डोळ्यात.  

पण इतक्या छोट्या मुलीला घेऊन मोर्चाला?

`मग काय करणार? तिला बघणारं आहेच कोण दुसरं... तिला घेऊन यावचं लागलं. म्हणून तर इतका सगळा पसाराही सोबत घ्यावा लागला ना, लग्नानंतर सहा सात वर्षांनंतर झालेली लाडकी मुलगी आहे हो आमची. तिच्या भविष्यासाठी आलोय. आमचं काय झालं आता. बस इसकी जिंदगी सुधर जाए...`  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com