नाशकात मुंढे पर्वाचा अस्त..! 

residentional photo
residentional photo

      एखादा अधिकारी प्रामाणिक व शिस्तबध्द असला तर लोक त्याला डोक्‍यावर घेतात परंतू तोचं अधिकारी उर्मट असला तर त्याचे काय होते याचे उदाहरण म्हणून नाशिकहून बदली झालेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे बघता येईल. मुंढे शिस्तबध्द आहेचं, गेल्या नऊ महिन्यातील त्यांच्यातील शिस्तबध्दपणा नाशिककरांना दिसल्यानेचं सुरुवातीला जोरदार स्वागत करतं सोशल मिडीयावरून त्यांना विरोध करणाऱ्यांना शब्दरुपाने झोपडले देखील परंतू जसा काळ पुढे गेला तसा त्यांच्यातील उर्मटपणा दिसला अन मुंढे विरोधकांची संख्या वाढली अन त्याचे रुपांतर मुंढे पर्वाच्या अस्तात झाले.

महापालिकेवर पकडं कोणाची यावरून शहरात एक हाती सत्ता असलेल्या भाजप मधील तिनही आमदारांमध्ये जणू काही स्पर्धा सुरुचं होती त्यातून एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण सुरु होते. मुख्यमंत्री, पालकमंत्री तर कधी प्रदेशाध्यक्षांकडे तक्रारीतून परस्परांचे खच्चीकरण करण्याची जणु स्पर्धाचं सुरु होती. त्यामुळेचं पालिकेच्या कामकाजावर वचकं निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे हनुमान म्हणून प्रसिध्द असलेले पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या शिफारशीवरून आयुक्त मुंढे यांची महापालिकेच्या आयुक्तपदी 8 फेब्रुवारीला नियुक्ती करण्यात आली अन तिथून महापालिकेत सुरु झाला मुंढे पर्वाचा अध्याय.
   बालेकिल्ला पुण्यातील नगरसेवक, कार्यकर्त्यांना खुश करणे देखील महत्वाचे वाटल्याने एकाचं दगडात दोन पक्षी मारण्याचे कार्य सत्ताधारी भाजपकडून घडले. नऊ फेब्रुवारीला मुंढे यांनी महापालिकेत एन्ट्री केली मुळातचं एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटातील हिरोप्रमाणे पालिका मुख्यालयात प्रवेश करतानाचं त्यांनी पहिला आदेश दिला तो पदाधिकाऱ्यांची वाहने हटविण्याचा तेथून पुढे त्यांच्या दालनापर्यंत पोहोचताना स्वच्छता, ड्रेसकोड, ओळखपत्रांच्या सक्तीचे आदेश एकामागोमाग आदेश देवून त्यांच्यातील शिस्तबध्दता अधोरेखित केली. त्यानंतर किमान पंधरा दिवस मुंढेचे नवनवीन आदेश कार्यालयात धडकायचे अन कर्मचायांमध्ये धडकी भरायची. 
अगदी कार्यालयात देव-देवतांचे फोटो देखील काढण्याचे आदेश दिल्याने दहशत निर्माण झाली. ती दहशत ईतकी भयानक स्वरुपाची होती कि, निलंबनाच्या कारवाई मुळे ज्या भागात कधी सफाई कर्मचारी पोहोचले नाही तेथे देखील सुटाबुटात दिसणारे सफाई कर्मचारी हातात झाडू घेवून दिसल्याने नाशिककरांना बरे वाटले अशी अनेक उदारणे आहेत. ऑनलाईन तक्रारींचा निपटारा, अपुर्ण चौकशा पुर्ण करणे, कामाला गती आदी मुळे मुंढे नाशिककरांच्या गळ्यातील ताईत बनले. मुंढे यांनी नाशिककरांची मने जिंकल्यानंतर त्यांनी लोकप्रतिनिधींकडे मोर्चा वळविला. प्रशासन अन लोकप्रतिनिधी यांनी समन्वयातून विकास करणे अपेक्षित असताना नेमके उलटे घडतं गेले. लोकप्रतिनिधी लोकशाही प्रणातील एक घटकं असून लोकांनी त्यांना निवडून दिले आहे हे मुंढे यांना मान्य नसल्यासारखी त्यांची कायम भुमिका राहीली. मी सांगेल तेच खरे या भुमिकेतून त्यांनी लोकप्रतिनिधींना सुध्दा ऑनलाईन तक्रारी करण्याचे आवाहन करून रोष ओढवून घेतला. जेव्हा लोकप्रतिनिधींनी एकजुट दाखविली त्याचवेळी त्यांनी त्यांच्यात फुट पाडून काहींना आपल्याकडे वळविताना दुश्‍मनचा दुश्‍मन तो आपला दोस्त या भुमिकेत ते दिसले. 
     वॉक विथ कमिशनर या उपक्रमाने तर लोकप्रतिनिधींची झोपचं उडवून दिली. नगरसेवकांकडे का जाता? थेट ऑनलाईन तक्रारी करा असे आवाहन त्यांनी सार्वजनिक ठिकाणांवरून केल्याने असंतोष भडकला. एककल्ली भुमिकेच्या कचाट्यात विरोधक देखील सापडल्याने लोकप्रतिनिधी एकवटले. करयोग्य मुल्य दरातील वाढीने मुंढे यांच्या विरोधात रान पेटले. महापालिकेचे 259 चौरस किलोमीटरचे क्षेत्रावर कर लावण्याचा अधिकार असल्याचा दावा करताना त्यांनी कामगार, शेतकरी व सर्वसामान्य नाशिककरांना मुंढे नावाचे गळ्यातील ताईत उतरविण्यास भाग पाडले. मुंढे या विषयावर देखील पुरून उरल्यानंतर संघर्ष अधिकचं तीव्र झाला. लोकप्रतिनिधींना विश्‍वासात न घेता कालिदास कलामंदीर व नेहरु उद्यानाचे परस्पर लोकार्पण, मिळकतींवर सहा पट दंडाची आकारणी, 
     सिडकोतील अनाधिकृत घरांवर हातोडा चालविण्याची धमकी, आदी कारणांमुळे आगीत तेल पडतं गेले अन शहरात मुंढे या नावाभोवतीचं सर्व विषय केंद्रीभुत झाले. शेवटपर्यंत मुंढेंनी त्यांचा हेकेखोरपणा न सोडल्याने मुंढे यांना एकेरी नावाने उल्लेख करण्यास सुरुवात झाली. त्यासाठी महासभा आखाडा बनला तो शेवटपर्यंत. मुंढे यांच्या बाबतीत शहरात दोन मतप्रवाह राहिले. पहिला मतप्रवाह त्यांच्या कामांना पाठींबा देणारा तर दुसरा प्रवाह त्यांच्या विरोधातील. सुरुवातीला पाठींबा देणाऱ्या वर्गाचे नंतर मोठ्या विरोधाकत रुपांतर झाले त्याला उर्मटपणा कारणीभुत ठरला. शिस्तबध्द अन उर्मटपणा यात मोठा फरक आहे. लोकशाहीत ताठर नव्हे तर लवचिक भुमिका घ्यावी लागते त्यातही चावडीचे स्वरुप असलेल्या व दररोज नागरिकांच्या मुलभूत गरजांशी संबंध येणाऱ्या स्थानिॅक स्वराज्य संस्थेत तरी हा उर्मटपणा चालतं नाही हे मुंढे यांनी ध्यानी घेतलेले बरे. अन्यथा मुंढे पर्वाचा उदय अन तत्काळ अंतर हे सुत्र कायम राहणार. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com