'असून अडचण, नसून खोळंबा'

गणेश शिंदे
शनिवार, 1 डिसेंबर 2018

''कव्हा कव्हा वाटतंय की ह्यो तोंडवासून गेल्याशिवाय माह्या जीवाला सुख मिळणार नाही. कव्हा कुठं जातोय शेण खाऊन येतोय आणि घरात बी लक्ष देत नाही. सतत आजारी पडतंय. रातच्याला खोकत बसतंय. देव असतोय म्हणत्यात मग असेल कुठं त्यो मेला तर त्याने का असलं फुटकं नशीब माझ्या कपाळी लिव्हलं असेल ? असा प्रश्न डोक्यात आलं की डोकं उठतयं. डोक्याला शिन येतोय.''

''वर्ष सहा महिने झालेत. लोकांच्या संगतीनं दारू काय पेतयं...लोळत लोळत येतंय काय...कपडे भरलेले, फाटलेले, तोंडात चारदोन शिव्या...खिशात फोन महिनाभर टिकत नाही...कोण तरी येतंय खिसा मारून जातंय. इथं काम करून करून कंबर बसलंय आणि ह्यो चार आठ दिवसाला घरात येऊन भांडण करतोय...शिव्या घालतोय. फक्त चाललंय ते पोटच्या गोळ्यासाठी म्हणून इथं टिकून राहिले.''

''कुठं जातोय काळ तोंड करतोय. बाहेरचे लागलेले नाद काय नाही कळायला मी काय दूध खुळी आहे व्हय. करणार काय ? असून अडचण आणि नसून खोळंबा अशी गत झालीया आयुष्याची. जे चाललंय ते दिवसभराच्या काम धंद्यावर. लोकांना हाई बापजाद्या ची जमीन जुमला ते खातील विकून पण आपलं काय ? रात दिवस काम करायचं यांनी फक्त ढोसून लोळत बसायचं. बायकांच्यात बसले तर बायका सरळ तोंड टाकून बोलतात की आला बै तुझा दारुडा नवरा. असं कोणत्या भवानीच्या तोंडून ऐकलं की तळपायाची आग मस्तकात जातीया. पण म्हणत्यात ना नडीला बैल विकता येतोय पण खोडीला काय करता येतंय. ''

''कव्हा कव्हा वाटतंय की ह्यो तोंडवासून गेल्याशिवाय माह्या जीवाला सुख मिळणार नाही. कव्हा कुठं जातोय शेण खाऊन येतोय आणि घरात बी लक्ष देत नाही. सतत आजारी पडतंय. रातच्याला खोकत बसतंय. देव असतोय म्हणत्यात मग असेल कुठं त्यो मेला तर त्याने का असलं फुटकं नशीब माझ्या कपाळी लिव्हलं असेल ? असा प्रश्न डोक्यात आलं की डोकं उठतयं. डोक्याला शिन येतोय.''

''काल पर्वा गेले होते ह्याला दवाखान्यात घेऊन डॉक्टर म्हणाला की, ह्यांना इथं काही उपचार होणार नाही. जिल्ह्यातील दवाखान्यात दाखवून पहा. म्हणून कोणाकडून तरी हजार दोन हजार घेते आणि घेऊन जाते दवाखान्यात..! ''

क्रमशः

टॅग्स

इतर ब्लॉग्स