एक अकेली

एक अकेली
एक अकेली

गुगलच्या सर्च इंजिनला "इंडियन वुमन‘ असा एक साधा सर्च दिला तर चुली फुंकणाऱ्या महिला, दवाखान्यात रांगेत उभ्या असलेल्या गरोदर महिला असे काही फोटो दिसू लागतात. अर्थातच या छायाचित्रांमध्ये भारताचे नाव उज्वल करणाऱ्या कर्तुत्ववान महिलादेखील दिसतात; मात्र हे प्रमाण थोडे कमी आहे. थोडेच दिवसांनी गुगलला देखील हे चित्र निश्‍चितच बदलावे लागेल. कारण भारतात पर्यटन व्यवसायाबरोबर एकटीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या देखील वाढत आहे. 

सतत कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महिला, संसार, करिअर, कुटुंबाच्या मागे धावताना दिसतात, मात्र स्वत:च्या आनंदासाठी वेळ उरतच नाही. हा वेळ काढावा लागतो. आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत एका छान पर्यटन स्थळी फिरण्याचे स्वप्न असते. कौटुंबिक सहली असतातच, मात्र एका नवख्या ग्रुप सोबत किंवा एकटीने विशेषत: बाईकने,बुलेटने सहल करण्याचेही स्वप्न बऱ्यर्च तरुणींचे असते. यातून आपल्याच मनाला रिफ्रेशमेंट मिळते. या ट्रेन्डचे कारण पर्यटनाविषयीची जागृकता आणि सहज उपलब्ध होणारी माहीती हे देखील असू शकते. 

एका खासगी कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार पाच ट्रिपपैकी एक ट्रिप ही एकटीने केलेली सहल असल्याचे दिसून आले. सर्वेक्षणा दरम्यान जून 2015पर्यंत अकरा लाख पर्यटकांपैकी साठ टक्के पर्यटक हे एकट्याने प्रवास करणारे होते. दोन वर्षात हे प्रमाण 35 टक्‍कयांपेक्षा जास्त असल्याचे नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात आढळले. भारतीय महिला एकट्‌याने प्रवास करताना ग्रुप टूरने जाण्याला पसंती देतात. या सर्वेक्षणातून आणखी एक बाब लक्षात आली आहे ती म्हणजे प्रवासी महिलांमध्ये तरुणींची संख्या जास्त आहे. 

पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, हा ट्रेंन्ड भारतात मोठ्‌या प्रमाणात वाढण्याचे महत्वाचे कारण म्हणजे पर्यटना विषयीची सहजपणे उपलब्ध होत असलेली माहिती. एकट्‌याने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी पहिला मुद्‌दा हा सुरक्षिततेचा असतो. यासाठी सबंधित कंपनीला पर्यटन स्थळी बसेस, महिला कॅबचालक, टॅक्‍सी चालक यांचे आगाऊ आरक्षण करावे लागते. यांचे आरक्षण करताना यांचे चालक शक्‍यतो महिला असतील याची खात्री करून घ्यावी लागते. 

सोलो वुमन्स ट्रॅव्हलर्सविषयी बोलताना हॉटेल्स डॉट कॉम या संकेतस्थळाचे वरिष्ठ मार्केटिंग मॅनेजर म्हणाले,"" आजकाल बरीच हॉटेल्स ही एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांची राहण्याची सुविधा देतात. या गोष्टीचा फायदा भविष्यात हॉटेलच्या "सुरक्षिततेची हमी‘ अशा चांगल्या प्रसिध्दीसाठीच होतो. या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान केलेल्या पाहणीत हॉटेल्स डॉट कॉमच्या संकेतस्थळावर सोलो ट्रॅव्हलर्सच्या यादीत "टॉप टेन‘ डेस्टिनेशन सर्च केली गेली.‘‘ 

या सर्वेक्षणाच्या निमित्ताने तुम्हीसुध्दा भारत किंवा भारताबाहेर एकटीने प्रवास केलेला असल्यास तुमचा अनुभव थोडक्‍यात लिहून आम्हाला webeditor@esakal.com या ईमेलवर पाठवावा. 

या माहितीत तुम्ही भेट दिलेल्या पर्यटन स्थळाचे नाव, जायचे कसे, तुम्हाला आवडलेली पाहण्यायोग्यठिकाणे, त्यांची छायाचित्रे यांचा उल्लेख नक्की करा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com