Loksabha 2019:  आजचा दिवस 'युवा' राजकारणाचा

जयपाल गायकवाड
मंगळवार, 12 मार्च 2019

आजचा दिवस युवा राजकीय नेत्यांचा आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे युवा चेहरे रोहित पवार आणि पार्थ पवार यांची चर्चा जोरात होतेय; तर गुजरातमध्ये हार्दिक पटेल आज काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय. पार्थ पवार यांची मावळमधून उमेदवारी जाहीर झाली आहे; तर रोहित पवार यांनी आपले आजोबा शरद पवार यांना माढा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतल्याने भावनिक पोस्ट केली आहे. त्यामुळे आजचा दिवस 'यंग ब्रिगेड' गाजवताना दिसतेय. 

ज्येष्ठ काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांचा बहुचर्चित भाजप प्रवेश अखेर आज झाला. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप प्रवेशाबद्दल डॉ. सुजय विखे यांची सर्वत्र चर्चा होत होती, त्याला आज पूर्णविराम मिळाला आहे. पक्षाची नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी डॉ. सुजय यांना बहाल करण्यात आली.

दुसरीकडे गुजरातमध्ये पाटीदार समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारे नेते हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. गुजरातमध्ये पाटीदार समाज मोठ्या संख्येनं आहे. पाटीदारांना आरक्षण मिळावं अशी मागणी व आंदोलन पाटीदारांतर्फे वेळोवेळी होत असते. हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाने या मागणीला मोठं बळ मिळालं होतं. 2015 मध्ये पाटीदार अनामत आंदोलन समितीतर्फे आरक्षणासाठी मोठं आंदोलन उभारण्यात आली होते. या आंदोलनाचं नेतृत्व हार्दिक पटेल यांनी केल्यापासून पाटीदार आंदोलनाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. काँग्रेसला हार्दिक पटेलच्या रूपाने गुजरातमध्ये भाजपाला टक्कर देणारा युवा चेहरा मिळाला आहे.

सोमवारी शरद पवार यांनी माढा मधून निवडणूक न लढविण्याचे जाहीर केले होते. त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच रोहित यांनी फेसबुक पोस्टद्वारे काल शरद पवार यांच्या निवडणुकीतून माघारीविषयी लिहीले आहे. तसेच अजित पवार यांचे पुत्र व शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांना मावळमधून लढता यावे यासाठी आजोबा शरद पवार यांनी निवडणूकीतून माघारी घेतली असल्याची चर्चा आहे. पण त्यांचे दुसरे नातू रोहीत यांनी मात्र आजोबांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

आज सोशल मीडियावर या युवा ब्रिगेडवर चर्चा होत आहे. प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाकडून एखादा युवा चेहरा म्हणून मैदानात उतरवताना दिसतोय. लवकरच लोकसभेच्या निवडणुकीत हे युवा चेहरे कशी टक्कर देतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

इतर ब्लॉग्स