कारणराजकारण : शंभर दिवसाचा वादा कुठं गेला...

सचिन बडे
गुरुवार, 11 एप्रिल 2019

मागील लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे राज्याचे तात्कालीन प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचार सभेत थेऊर येथील बंद असलेला यशवंत सहकारी साखर कारखाना १०० दिवसामध्ये सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गेल्या पाच वर्षात या कारखण्याचा भोंगा वाजू शकला नाही.

पुणे : मागील लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे राज्याचे तात्कालीन प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचार सभेत थेऊर येथील बंद असलेला यशवंत सहकारी साखर कारखाना १०० दिवसामध्ये सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गेल्या पाच वर्षात या कारखण्याचा भोंगा वाजू शकला नाही.

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे उमेदवार आढळराव पाटील यांनी यशवंत सहकारी कारखान्याचा उद्दा प्रमुख केला होता. त्यांनी प्रचारामध्ये हा कारखाना १०० दिवसामध्ये सुरु करण्याचे आश्वास दिले होते. आढळरावांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांनी या भागात सभा घेतली होती. तेंव्हा, सत्तेत आल्यावर शंभर दिवसामध्ये हा कारखाना सुरु करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. 

या निवडणुकीत आढळराव पाटील विजयी झाले. तर, केंद्रात आणि त्यानंतर राज्यात युतीचे सरकार आले. मात्र, गेल्या पाच हा कारखाना सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांचा आढळरावांवर रोष आहे. स्थानिकामध्ये युती विरोधी भावना आहे. हा कारखाना सुरु न झाल्याने या भागाचा विकास मंदवला असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. तसेच विरोधी पक्षानेही हा मुद्दा उचलून धरला आहे. यावर ते आढळराव पाटील यांच्यावर टिका करण्याची संधी साधता आहेत.

इतर ब्लॉग्स