Loksabha Results: अमेठीवासियांना गृहीत धरणं राहुल यांना नडलं

अमोल कविटकर
शुक्रवार, 24 मे 2019

अमेठी आणि गांधी परिवार हे नातं तुटेल, असं कदाचित भाजवाल्यांनाही वाटलं नसेल. पण ते घडलं आणि गांधी परिवार हादरला. कारण आजतागायत अनेक दिग्गजांनी हा गड भेडण्याच्या प्रयत्न केला, मात्र कोणालाही यश मिळालं नव्हतं. म्हणूनच स्मृती इराणींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव वेगळा आणि चर्चेचा विषय ठरतोय. 'अमेठी का MP, 2019 का PM' या अमेठी काँग्रेसने दिलेल्या नाऱ्याला अमेठीवासीयांनीच अक्षरशः सुरुंग लावला.

अमेठी मतदारसंघातील जनतेला गृहीत धरणं, ही राहुल गांधी यांची सर्वांत मोठी चूक त्यांच्याच अंगलट आली. 'अमेठी मेरा परिवार हैं' असं राहुल सांगत आले. मात्र हे घर भेदायला स्मृती यांनी गेल्या लोकसभेच्या प्रभावानंतर लागलीच सुरुवात केली. गेल्या पराभवानंतरही खचून न जाता स्मृती अमेठीत जात राहिल्या, लोकांशी संवाद साधत राहिल्या आणि प्रलंबित कामं करत राहिल्या. अमेठीतील सर्वच्या सर्व गावं त्यांनी तीन वेळा पालथी घातली. दहा वर्षे केंद्रात सत्ता असताना अमेठीला भरीव काहीच मिळालं नाही, हा मुद्दा त्यांनी लावून धरला. 'दीदी' या नावाने त्यांची युवक-युवती आणि खासकरून महिला वर्गात क्रेझ निर्माण झाली. पाच वर्षात वाढवलेली संघटना आणि संघाचं कमालीचं चिवट केडर त्यांना विजयापर्यंत पोहोचवून गेलं.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात सलग दुसऱ्यांदा मैदानात उतरलेल्या स्मृती इराणी यांनी यंदा केलेली तयारी लाजबाव होती. सलग तीन टर्म खासदार असल्यामुळे आलेली अँटी-इंकंबन्सी आणि अमेठी लोकसभेतील पायाभूत सुविधांचे प्रश्न आपसूकच प्रमुख मुद्दे त्यांनी काँग्रेस अध्यक्षांच्या विरोधात बनविले. महिला वर्गाचा आणि नवमतदारांचा त्यांना असलेला प्रतिसाद त्यांना विजयापर्यंत घेऊन जाण्यासाठी फायदेशीर ठरला.

इतर ब्लॉग्स