'अनर्थ' विकासनिती : सर्वनाशाच्या उंबरठ्यावर? या पुस्तकाच्या निमित्ताने...

Anarth
Anarth

'अनर्थ' विकासनिती : सर्वनाशाच्या उंबरठ्यावर? या समर्पक शिर्षकावर तेवढ्याच ताकदीने केलेलं भाष्य हा या पुस्तकाचा गाभा. सद्यस्थितीला जगासमोर पर्यावरण संवर्धनाचे खूप मोठे आव्हान आहे. जागतिक पातळीवर अनेक पर्यावरणाच्या चळवळी उभारल्या जात आहेत. पाश्चिमात्य/अमेरिकन जीवनशैली कुठेतरी थांबली पहिजे, प्रचंड वेगाने पसरणाऱ्या चंगळवादावर आवर घातला गेला पाहिजे आणि निसर्गाचा समतोल राखून शाश्वत विकासाला अंगीकारलं पाहिजे. हे पर्यावरणाचं आव्हान फक्त अविकसित किंवा गरीब देशांवर आहे असं नाही, तर त्याचे दुष्परिणाम हे सबंध जगाला भोगावे लागत आहेत.

स्वीडनच्या ग्रेटा थनबर्ग या 16 वर्षीय मुलीने ज्याप्रमाणे पर्यावरण संवर्धनाचा लढा त्या देशात उभारला आहे, असंच काहीसं आशावादी काम प्रत्येक देशात व्हायला हवं. 'अनर्थ'मध्ये आजच्या भारतातील सद्यस्थितीपासून ते जीडीपी, चंगळवाद, ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरणाचं राजकारण (हे interesting आहे), पाण्याचं दुर्भिक्ष, प्रदूषण अशा अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण भाष्य केलेलं आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरणासंबंधी केले गेलेले 'क्योटो Protocol' किंवा 'परिस करार' आणि त्यामागचे राजकारण, पर्यावरण संवर्धनापेक्षा औद्योगीकरणाला दिलं गेलेलं अवास्तव महत्त्व आणि त्याचे भविष्यात होणारे वाईट परिणाम इत्यादी गोष्टींविषयी वाचायला मिळतं.

एवढच नाही, तर जागतिकीकरणानंतर अर्थव्यवस्थेच्या आकडेवारीसह शेती, उद्योग ही क्षेत्र कमी होऊन सेवा क्षेत्रच कसं वाढलं, याचंही सखोल विश्लेषण या पुस्तकात केलेलं आहे. जागतिकीकरणाचे पर्यावरणावर झालेले गंभीर परिणाम आणि 'जीडीपी'वाढीच्या या स्पर्धेत पर्यावरणाचा झालेला प्रचंड प्रमाणात ऱ्हास.. आणि त्याचे आपल्या दैनंदिन जीवनावरील परिणाम या गोष्टी वाचताना माणसाचा विध्वंसक अवतार कसा वाढत गेला, हे जाणवतं. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे आहे.

पर्यावरणाचं संवर्धन हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य तर आहेच, पण संवेदनशील जबाबदारीही आहे. अशा प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास होत गेला, तर पुढच्या काहीच वर्षात मानव जातीला या पृथ्वीवर जगणं अशक्य होईल. माणूस जसा निसर्गापासून दूर होत चाललाय, तसे त्याला निसर्गाचे झटके बसायला लागलेत. अवेळी येणारा पाऊस, उष्माघात, केरळ किंवा माळीणसारख्या दुर्दैवी घटना या मानवाने निसर्गाकडे दुर्लक्ष केल्यामुळे घडलेल्या घटना आहेत. त्यामुळे निसर्गाप्रमाणे राहावं..निसर्गाशी जुळवून घ्यावं म्हणजे निसर्ग आपल्याला छान जगवतो..शेवटी निसर्ग हा आपल्या सर्वांचा बाप आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com