सुवासिक क्षेत्रातील 'सुगंधित' संधी

सुवासिक क्षेत्रातील 'सुगंधित' संधी
सुवासिक क्षेत्रातील 'सुगंधित' संधी

आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेले सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मिती क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक संधी आहेत. वेगवेगळे परफ्युम्स, अत्तरे यांची आवड असल्यास "परफ्युम टेस्टर‘ या क्रिएटिव्ह क्षेत्रात तुम्ही नक्की एन्ट्री करू शकता. भारतीय जीवनशैलीत या क्षेत्राची प्रदीर्घ परंपरा आहे. नैसर्गिक पदार्थांपासून वेगवेगळ्या गंधांचे अर्क, अत्तरे बनविण्याची आपली हजारो वर्षांपासूनची परंपरा आहे. यामध्ये विशेषत: फुले, पाने, फळे, वाळा, लाकूड यापासून अर्क केले जात असत. या नैसर्गिक सुगंधांना कृत्रिम रसायनांची जोड मिळाल्याने गंधाचे अनेक प्रकार विकसित होत आहेत. त्यामुळे या सुवासिक क्षेत्रात दिवसेंदिवस करिअरच्या नवनव्या संधी निर्माण होत आहेत. या आव्हानात्मक क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी महत्वाच्या टिप्स :

आवश्‍यक  शिक्षण 
भारतात या क्षेत्राशी निगडित प्रशिक्षण देणाऱ्या संस्था खूपच कमी आहेत. परफ्युमरी क्षेत्रात येण्यासाठी किमान रसायन शास्त्राचा पदवीधर, केमिकल इंजिनियर असणे आवश्‍यक आहे. त्यानंतर मास्टर्स आणि डॉक्‍टरेट पदवी घेऊन या क्षेत्रात उच्चपदापर्यंत जाऊ शकता. फ्रेशर्सना पदवी अभ्यासक्रमात हजारो सुगंधांचे ज्ञान तसेच त्यातील प्रकार यांचे प्राथमिक ओळख करून दिली जाते. त्यानंतर प्रशिक्षण कालावधीत नैसर्गिक आणि कृत्रिम रसायनांद्वारे नवीन सुगंध तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार ही कॉम्बिनेशन बदलून नवीन अर्क, परफ्युम्स तयार करू शकता. 

परफ्युमरी क्षेत्रासाठी आवश्‍यक प्रशिक्षण कोठे घ्याल? 

  • मुंबई विद्यापीठ आणि इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्‍नॉलॉजी या संस्थेत पदवी घेतल्यानंतर "मास्टर्स डिग्री‘ कोर्स उपलब्ध आहे.
  • उत्तर प्रदेशातील "फ्रायग्रन्स ऍण्ड फ्लेवर्स डेव्हलपमेम्ट प्रोग्रॅम इन अरोमा मॅनेजमेंट‘ हा एक वर्षांचा कोर्स उपलब्ध आहे. या कोर्ससाठी केमिस्ट्रीची पार्श्‍वभूमी असलेल्या आणि नसलेल्या विद्यार्थांसाठी खुला आहे.
  • देहरादून येथे फॉरेस्ट रिसर्च इनस्टीट्यूटमध्ये अरोमा टेक्‍नॉलॉजीतील पद्युत्तर शिक्षण (पीजी) तसेच काही अल्प कालावधीचे (शॉर्ट कोर्सेस) उपलब्ध आहेत.
  • मुंबईतील केळकर एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत येणाऱ्या व्ही.जी.वझे महाविद्यालयात दोन वर्षांचा "पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन परफ्युमरी ऍण्ड कॉस्मेटिक मॅनेजमेन्ट‘ नावाचा कोर्स उपलब्ध आहे.
  • भारताबाहेरील नामांकित विद्यापीठांमध्येही परफ्युमरीचे कोर्स उपलब्ध आहेत. यापैकी फ्रान्समधील व्हर्सेलिस विद्यापीठात "इस्टिट्युट सुपरियर इंटरनॅशनल ड्यु परफ्युम‘ संस्थेने आखलेला "युरोपियन फ्रायग्रन्स ऍण्ड कॉस्मेटिक्‍स मास्टर्स डिग्री‘ हा सर्वोत्तम कोर्स आहे. या विद्यापीठाचे इटलीतील पाडू विद्यापीठाशी संलग्न आहे. परदेशातील बहुतेक नामांकित कंपन्यांची स्वत:ची परफ्युमरी महाविद्यालये आहेत.
  • परफ्युमरी क्षेत्रासाठी आवश्‍यक कौशल्ये 
    या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी तुमच्याकडे गंधाचे, गंध मिश्रणाचे उत्तम ज्ञान, वास लक्षात ठेवण्याची क्षमता, पेशन्स, प्रयोगशाळेत काम करण्याची सवय, वेळेचे व्यवस्थापन, संवाद-लेखन कौशल्य, जिज्ञासा आदी गुण असणे आवश्‍यक आहे. याशिवाय मानवी भाव-भावनांचे, बदलत्या मानसिकतेचे, मूडस, मेमरीज यांचेही ज्ञान, सेन्स असणे गरजेचे आहे. अर्थातच फ्रेशर्सना इंग्रजी, मराठी भाषा येणे गरजेचे असून पर्सनल केअरचे सखोल ज्ञान आवश्‍यकच आहे. 
  • टेक्‍निकल स्किलसेट 
    सॉफ्टवेअर टेस्टिंग, मॅन्युअल टेस्टिंग, फंक्‍शनल टेस्टिंग

  • परफ्युमरी क्षेत्रातील करिअरच्या संधी 
  • भारतात सध्या हजारो परफ्युमिस्ट आहेत. त्यामुळे या क्षेत्रात येण्यासाठी निश्‍चितच तुम्हाला संधी आहे. भारतात विविध व्यावसायिक खाद्य उत्पादनांमध्ये सुगंधी पदार्थांचा वापर केला जातो.
  • परफ्युम टेस्टरने जास्तीत जास्त वेळ सुगंधांच्या प्रयोगावर घालवाल तितकी तुम्ही परफ्युम टेस्टर म्हणून डेव्हलप होऊ शकता. परफ्युम टेस्टरचे काम हे फूड टेस्टरसारखेच असते. सबंधित कंपनीने बनविलेल्या उत्पादनामध्ये ग्राहकाच्या मागणीनुसार प्रयोग करून, अभ्यास करून बदल सुचविणे हे असते.
  • फ्रायग्रन्स केमिस्टला वेगवेगळ्या क्‍लिनिंग प्रॉडक्‍टमध्ये, बाथ प्रॉडक्‍ट,बॉडी सेंट यामध्ये संधी मिळते.
  • मोठ्या परफ्युम कंपनीमध्ये नवीन सुगंधींची चाचणी करणारे ऍपलिकेशन तयार केली जातात. येथे सॉफ्टवेअर विकसकांना पर्यावरणपूरक नियम, गुणवत्ता, कायदेशीरबाबींचा विचार करून तो विकसित करावा लागतो.
  • विविध परफ्युम हाऊसमध्ये परफ्युमिस्टना नोकरीची संधी मिळते. येथे कस्टमाइज सुगंधी द्रव्यांचे उत्पादन केले जाते.
  • आंतराष्ट्रीय कंपन्यांमध्ये संधी 
    आंतराष्ट्रीय फ्लेवर्स ऍन्ड फ्रायग्रन्स (International Flavors & Fragrances Inc (आयएफएफ) न्यूयॉर्क, स्विर्त्झलॅण्डमधील Givaudan and Firmenich, जर्मनीतील Symrise, Fragrance रिसोर्स ऍण्ड ड्रोम फ्राग्ररन्स, फ्रान्समधील Mane and Robertet, इंग्लंडमधील Ungerer & Company, जपानमधील तागासाको या कंपन्या मोठ्या प्रमाणात सुंगंधी द्रव्यांचे उत्पादन करतात. 

    भारतातील संधी : 
      ■ भारतात मुंबईतील एस.एन.केळकर 
      ■ स्वित्झर्लॅण्डमधील Givaudan and Firmenich, जर्मनीतील Symrise, Fragrance, जपानमधील तागासाको यासारख्या आंतराष्ट्रीय कंपन्यांची 
        भारतात कार्यालये आहेत. 
      ■ मुंबई, नवी मुंबई, दिल्ली,नागपूर, अहमदाबाद यासारख्या शहरात सौंदर्य प्रसाधन उत्पादक कंपन्या आहेत.
  • या क्षेत्रातील उदयोन्मुख उद्योग आणि मिळणारे वेतन 
  • या क्षेत्रात आलेल्या परफ्युमिस्टना फूड ब्रेवरेज, गिफ्ट आर्टिकल्स, जाहिरात क्षेत्रात कागदासाठी, कॅण्डल्स, रुम फ्रेशनर,सौंदर्य प्रसाधने
  • क्षेत्रात परफ्युम्सची मोठ्या प्रमाणात फ्रायग्रन्सची मागणी होत आहे. भारतात सध्या परफ्युमरी क्षेत्राची व्याप्ती वाढत असून विड्याचे पान, चहा, वाइन यासारख्या खाद्य पदार्थ-पेय, अरोमा थेरपी,इतर सौंदर्य प्रसाधनांच्या क्षेत्रात वेगवेगळ्या सुगंधांची प्रचंड मागणी होत आहेत.
  • सॅलरी मॅटर्स 

  • बेसिक स्टार्ट : -20 ते 25 हजार
  • नामांकित संस्थेतून परफ्युम क्षेत्रातील पदवी घेतल्यास उमेदवाराच्या क्षमतेनुसार पगाराची सुरवात 35 हजारपासून
  • प्रयोगशील परफ्युमरला त्याच्या अनुभवानुसार त्याच्या पगाराची सुरवात 50 ते 60 हजार रुपयांपासून

अत्तरांची राजधानी
उत्तर प्रदेशातील कनौज हे गाव भारताची अत्तरांची राजधानी म्हणून ओळखले जाते. गंगेच्या किनारी असलेले हे गाव राजा हर्षवर्धनच्या राजधानीचे ठिकाण
होते. नैसर्गिक अत्तरे बनविण्याचा पिढीजात व्यवसाय येथे केला जातो. कनौज शहराला अत्तरांच्या व्यवसायांचा मोठा इतिहास लाभला आहे. या शहरात
बनविलेली अत्तरे ही देश-विदेशात विकली जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com