तरूणाईने आदर्श घ्यावा अशा नेत्या 

Sushma Swaraj
Sushma Swaraj

नेतृत्व गुण कसे असावेत याचं उत्तर जसं अटलबिहारी वाजपेयी येतं तसं आता ते सुषमा स्वराज यांच्याबाबतीतही देता येईल. तरूणाईने  आदर्श घ्यावा अशा या नेत्या आपल्यातून जाण्याने मोठी हानी झाली आहे, पण आजच्या नेते होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या तरूणाईने किमान  त्यांचे गेल्या पाच वर्षातील खरं तर त्यांच्या जीवनप्रवासाकडेच बघून गुणांचा अंगिकार केला तर एक उत्तम, शालीन, अभ्यासू, आक्रमक सहृदयी नेता कसा असतो याचं उत्तर आपोआप मिळेल. 

आजकाल राजकारण या विषयावर अनेकांगी मतं व्यक्‍त होत असतात मात्र सकारात्मक वा आशादायक चित्र निर्माण करणारं व्यक्‍तीमत्व  राजकारणात अलिकडे दिसत नाहीत.त्यांचा अभाव असल्याने जी काही राजकीय नेते मंडळी आपल्या कर्तृत्वाचे दिवे लावतात त्यावर  होणाऱ्या टीकांमुळे राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत असतो अथवा त्याबाबत तिटकाराच अधिक असल्याने नकारात्मक भावना असतात. तरूणाईला राजकारणाचं आकर्षण नक्‍कीच आहे.नेतृत्व घडविण्यासाठी खरं तर असे आदर्श व्यक्‍तीमत्व निवडण्याची गरज आहे.  सुषमा स्वराज यांच्या कार्यपध्दतीने पुन्हा हा आदर्श व्यक्‍तीमत्वाचा धडा अधोरेखित केला आहे. 

अलिकडचा त्यांचा जीवनप्रवास यासाठी महत्वाचा वाटतो की, वयाच्या पन्नाशी नंतर त्यांनी आजच्या बदलत्या काळातील तरूणाईला  असणाऱ्या आशा-आकाक्षांचा सुक्ष्म अभ्यास करीत त्यांना हवे असणारे बदल स्वीकारले आणि त्यांच्या मदतीसाठी त्या तत्पर राहिल्यात.  केंद्रीय मंत्रीपदावर असणारी एक व्यक्‍ती अतिशय सामान्य व्यक्‍तीच्या जीवनाशी कशी समरस होऊ शकते त्यांच्या सहकार्यासाठी किती धडपड करू शकते,त्यांना मदत देतांना आपल्या पदाचा उपयोग करून मदत करू शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सुषमा स्वराज होत. आपल्या परराष्ट्रमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी अशा अनेक गरजवंतासाठी जो मदतीचा,सहकार्याचा हात पुढे केला त्यामुळे आदर्श  नेतृत्वाच्या व्याख्येला आणखी चकाची आली.अलिकडच्या काळातील सुरेश प्रभू,पियूष गोयल,स्व.मनोहर पर्रीकर या नेत्यांनी सोशल 
मीडियावर सक्रीय राहून या तरूणाईसमवेत जुळवून घेण्याची जी किमया साधली आहे ती काळाची आणि उत्तम नेतृत्वासाठी मोठी गरज असल्याचे येथे नमूद करावे वाटते.ज्या अवस्थेतून आज देश जात आहे त्यासाठी आता तरूणाईच्या कार्यक्षमतेसोबतच उत्तम गुणांची पारख अधोरेखित होणं गरजेचं आहे. 

सुषमा स्वराज यांनी नेता आणि माणूसपण यांच्यातील जे अंतर कमी केलं ते खरोखरच अद्वितीय कार्य म्हणायला हवं. एका उच्च पदावर असतांना त्यांनी ओपन हार्ट सर्जरीसाठी पाकिस्तानी मुलगी शिरीन शिराज यांना वर्षभरासाठी वैद्यकीय व्हिसा देण्याचे जाहीर करून उत्तम नेतृत्वाचं जे उदाहरण घालून दिलं त्याचं या देशातील तरूणाईने समाज माध्यमातून कौतुक करतांना आपल्यातील चांगल्या कामांचा देखील संकल्प स्पष्ट केला आहे.आज उत्तम नेतृत्वासाठी त्यांचा जीवनप्रवास तरूणाईसाठी प्रेरक ठरेल यात शंका नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com