हे कोल्हापुर हाय; इथं विषय 'हार्ड'च असतो!

एक कोल्हापूरकर
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

कोल्हापुर हाय इथ कुणी आपलीच काॅलर ताट करायची नाय, अरे ला कारे हे उत्तर ठरलय आणि भावा ला ये बसकी भावा तुबी हे पण उत्तर ठरलेलंच लडेंगे भी, बचायेंगे भी और बचेंगे भी!

गेले 8 दिवस महापुराने इथं थैमान घातलाय, 3 दिवस झाले महा महाप्रलय आलाय, बघता बघता अर्धे अधिक कोल्हापुर पाण्याखाली गेले. कळंबा तलावाचा ओव्हर फ्लो एखाद्या धबधब्या सारखा होऊ लागला, एक एक करत राधानगरी, काळ्म्मावाडी, चांदोली व इतर अनेक लहान मोठी धरणे ओव्हर फ्लो होऊ लागली, पंचगंगा भरली, खवळली, बेभान झाली, कृष्णा नदीला भेटल्यावर या भेटीला वेगळच वळन लागला व नदी फुगु लागली एक एक गावे तिने कवेत घ्यायला सुरवात केली. एक एक करत कोकणात जाणारे सर्व घाट रस्ते बंद होत गेले. नंतर हायवे सुद्धा बंद आता कोल्हापूर एक लहान मोठ्या बेटांचा समुह बनला. जगाशी संपर्क तुटला. पण सलाम कोल्हापुरकरांना त्यांच्या हिम्मतीला! 

पहिल्या दिवसापासून मदत सुरू झाली, कलेक्टर आणि त्यांची यंत्रणा, महानगरपालिका आयुक्त आणि त्यांची यंत्रणा, पोलिस अधिक्षक आणि त्यांची यंत्रणा, कोल्हापुरी तालीम, मंडळे, युवक मंडळी, मठ, मंदिर, शाहु महाराजांची देन असलेली बोर्डिंगज, मस्जिद, मदरशे, व्यापारी संघटना सर्वच्या सर्व कामाला लागले, लोकांनी आपल्या राफ्ट, रबरी बोटी, काहिली, मोठ मोठ्या इन्नरी इत्यादींनी मदतीचा सपाटा लावला. 11 हजार पेक्षा जास्त घरांतून 55 हजार पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित जागी पोहोचते केले. लाइट्स नाहीत, प्यायला पाणी नाही, अन्न नाही, मदतीचा पुकारा झाला हजारो हात कामाला लागले, हाॅटेलस्, खानावळी, दानशूर सरसावले, लाखों जेवणाचे पॅकेज व पाण्याचे बोटलस तयार झाली पण दुर वर पाण्यात अडकलेल्यां पर्यंत पोहचू कसे हा प्रश्न पण युवकांनी हार नाही मानली, मिळेल ते तरंगनारे प्रकार वापरून प्रसंगी पोहत जावून स्वतः चा जीव धोक्यात घालून मदत पोहोचविली. लाखों लोकां पर्यंत मदत पोहोचविली पण कोठे ही मदत करणाऱ्याचा दिखाऊपणा नाही आणि कोठेही मदत घेनार्याचा हल्ला गुल्ला नाही की मिळतय म्हणून हपापलेले लोक नाहीत, सगळच कसं शिस्तीत चालू.

ताई, माई, आक्का,  भावा, अण्णा, दादा अत्यंत आदरणीय आर्जव करून प्रसंगी जबरदस्ती करून मदत स्विकारायला लावली सलाम आहे कोल्हापुरकरांना, कोठे ही नगरसेवक, लोक प्रतिनिधि, प्रशाशन यांच्या वर चिखलफेक नाही, कसलेही आरोप नाहीत, हे आसमानी संकट आहे आणि याला आपणच सामोरे जायला पाहीजे याचे कोल्हापुर करांना उपजतच ज्ञान असावे त्याच वेळी एका मोठ्या  महानगराचे प्रथम नागरिक काॅलनी मधे पाणी घुसलेले पाहनी करायला एक दिवस उशीरा पोहोचले म्हणून त्यांना घेराव घालून गोंधळ घालणारे लोक आणि त्या घेरावात प्रश्न विचारनार्या महिलेचे हात पिरगळनारे ऊद्दाम प्रथम नागरिक कोठे, तसेच कोल्हापुर शेजारीलच शहरात उपलब्ध असलेल्या दोन्ही रेस्क्यू बोटींतून मदत करन्या एवजी 3 तास फेरफटका मारणारे लोक प्रतिनिधी कोठे महापूर पहायला लोकांची झुंबड उडाली काही हुल्लड़ बाजांनी दंगा करायला सुरवात करताच पोलिसांनी आपल्या पद्धति ने लगेच पायबंद घातला पेट्रोल संपले, पण सगळच आलबेल असल्या सारख वागायच ठरल मदतीचा महापूर पहायला मिळाला, लोकांनी आपली घरे उघडले, तालीम, मठ, मंदिर, मस्जिद, बोर्डिंग सर्व खुले केले, हजारों कपडे, अंथरून पांघरून जमा झाला.

महापूराने हायवे बंद झाल्यावर दुसर्या दिवशी मिलिटरी येणार म्हणून समजले, चौथ्या दिवशी कळाले मिलिटरी सुद्धा कोठेतरी अडकलिय पण कोल्हापुरी मिलिटरी थांबली नाही अथक प्रयास चालु झाले प्रचंड प्रवाहात सुद्धा आंबेवाडी, प्रयाग चिखली सारख्या पुराने वेढलेल्या गावांना मदत पोहोचवने सुरूच आहे. हजारो प्रवासी वाटेत राधानगरी, वाठार इत्यादी ठिकाणी अडवले सुरवातिला काही लोकांनी 15 रूपया चा वडा 50 रूपया ला विक्रि करू लागताच कोल्हापुरी लोकांनी त्या अडकलेल्यां ना मोफत अन्न पाणी पुरवून आपले दातृत्व दाखवले.

कोल्हापुरी एक अजब रसायन आहे, एक स्वतंत्र संस्थान आहे, इतिहास साक्षी आहे आजपर्यंत कोणताही राजकीय वरदहस्त नाही पण कोल्हापुरी नेहमीच अव्वल, येथे व्यक्ती पुजेला स्थान नाही. लोक प्रतिनिधि आपले काम करत राहतात आणि कोल्हापुरी आपल्या कामात व्यस्त असतात काही राजकिय गटांनी मदतीचे फोटो शेअर करताच त्यांचा लगेच कोल्हापुरी भाषेत निषेध करण्यात आलाआता मिलिटरी पोहोचली आहे  यांत्रिक बोटी पण आल्यात, पावसाचा जोरही कमी होतोय,  संपूर्ण महापुराने वेढलेल्या गावांना मदत पोहोचवने सुरूच आहे, काही काळजी करू नका सगळ्यांना मदत मिळेल.

कोणीही कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरतील म्हणून इंटरनेट स्लो करण्यात आले पण कोल्हापुरी लोक अफवा लगेच खोडून काढुन सत्य समोर आणताहेत आणि इंटरनेट मदतीसाठी गरजेच आहे हे लक्ष्यात येताच ते पूर्ववत करण्यात आले. कोल्हापुर बाहेरच्यांनी पसरवलेल्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका. कोल्हापुर हाय इथ कुणी आपलीच काॅलर ताट करायची नाय, अरे ला कारे हे उत्तर ठरलय आणि भावा ला ये बसकी भावा तुबी हे पण उत्तर ठरलेलंच लडेंगे भी, बचायेंगे भी और बचेंगे भी!

इतर ब्लॉग्स