पुरामुळे सांगलीकरांना झाली आबांच्या 'त्या' धमकीची आठवण

प्रवीण डोके
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

२००५ मधील तत्कालीन कर्नाटक सरकारने या धमकीला घाबरून अलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडून कृष्णेच्या पाण्याला वाट करून दिली होती. यामुळे पुढील काही काळातच सांगली आणि पूरग्रस्त भागातील सर्व जनजीवन पूर्ववत झाले होते.

आबांच्या त्या धमकी दिली आणि कर्नाटक सरकारने अलमट्टीचे सर्व दरवाजे उघडले; सांगली पुर्ववत झाली सांगलीत महापूर आल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. याआधी २००५ साली सांगलीत असाच महापूर आला होता. त्यावेळी कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाचे दरवाजे उघण्यास तयार नव्हते. त्यामुळे पेच निर्माण झाला होता.

परंतु त्यावेळी हा पूर कमी होण्यासाठी अलमट्टी धरणाचे दरवाजे उघडणे गरजेचे होते. त्यासाठी स्व. आर. आर. आबांनी कर्नाटक सरकारला धमकीच दिली होती. ती धमकी अशी होती की, कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाचे दरवाजे उघडून कृष्णेच्या पाण्याला पुढे जाण्यासाठी जर वाट करून दिली नाहीतर तर, आम्ही आमच्या राज्यातल्या धरणाचे सर्व दरवाजे उघडून सर्व पाणी कर्नाटकात घुसवू.

त्यामुळे २००५ मधील तत्कालीन कर्नाटक सरकारने या धमकीला घाबरून अलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडून कृष्णेच्या पाण्याला वाट करून दिली होती. यामुळे पुढील काही काळातच सांगली आणि पूरग्रस्त भागातील सर्व जनजीवन पूर्ववत झाले होते. मुख्यमंत्री महोदयांनीही अशीच भूमिका घेऊन यावर लवकरात लवकर तोडगा काढावा म्हणून सांगलीतील नागरिक  स्व. आर. आर. आबा यांची आठवण काढत आहेत. 

त्याभागतील अनेक नागरिक म्हणत आहेत की, आबा असते तर आतापर्यंत अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यासाठी कर्नाटक सरकारला प्रवृत्त केले असते.

इतर ब्लॉग्स