'First day First show at Home' नको रे बाबा! 

मृणाल वानखेडे
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

मला नाही चित्रपट घरी बघायला आवडणार, तेही 'first day first show at home'. नको रे बाबा! कलाकारांनी केलेली मेहनत मला चित्रपट गृहात जाऊन अनुभवायला अवडेल, एखाद्या टेक्नॉलॉजी मला नकारायला अवडेल. कारण मग ती सगळी मजा जाईल. ती थिएटरला जाण्याची, पैसे साठवण्याची, पाॅपकॅर्न खाण्याची, एसीमध्ये कुडकुडत चित्रपट बघण्याची, मोठ्या पडद्यावर त्या मोठ्या थिएटर मध्ये आवडत्या अभिनेत्यांना बघण्याची, सुरेख ओठवणी बनवण्याची, पिक्चरमध्ये अनोळखी लोकांसहित विनोदावर हसण्याची, घाबरण्याची, रडण्याची. सगळीच, अगदी सगळीच मजा जाईल.

आई नेहमी तिच्या लहानपणाच्या गोष्टी सांगते. ऐकुन फार मजा येते. त्यात एक लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे, गावाला ओपन थिएटर असायच, सफेद पडद्यावर पिक्चर दाखवला जायचा, तिकिट 2 किंवा फार फार तर 5 रुपये असायच. आमच्यासाठी हे सगळ अजबच, आम्हाला एसीमध्ये बसुन चित्रपट बघण्याची सवय. कधी कधी तर मध्यंतरात पॉपकॉर्न, कोल्ड ड्रिंक हे सहजच होत. 

मला माझ्या आई सारखीच चित्रपट बघण्याची फार आवड. थिएटरमध्ये चित्रपट बघायला जाण हे, परम सुखच माझ्येसाठी. पहिला थिएटरमध्ये बघितलेला चित्रपट म्हणजे, गंगाजल. त्यानंतर आता तर मी चिक्कार चित्रपट पहाते. आणि आता पुढच्या शुक्रवारची वाट देखील मी पाहात्ये! 

माझं किंवा आता 'आपलं' म्हणूया, आपल आणि चित्रपटाच एक घट्ट नात तयार झाल आहे. आपल चित्रपटांवर खूप प्रेम आणि तितकच त्यांचही आपल्यावर. म्हणजे बघा हं, एखाद्या चित्रपटाचा टिझर येतो. आपण तो बघतो, कित्येकदा आपण अज्ञात असतो, आपल्याला कोणी तरी सांगत मग आपण लगेच तो टिझर पाहातो. आपली उत्सुकता वाढते. मग ट्रेलर रिलीज होतो. मग गाणी, अय्या पोस्टर राहिलच की. पोस्टर. पहिलं ट्रेलर मग कदाचित दुसरं. मग प्रतिक्रिया, चर्चा, आवडणं, न आवडणं, उतसुक्ता, उत्साह, आनंद, ओढ आणि अजुन भरपुर काही. आणि स्टार सोशल मीडियावर वेग वेगळे अपडेत देतच असतात. मग येतो तो चित्रपट रिलीज होणारा आठवडा. आपण वाट बघत असतो, खुप वाट बघत असतो. शुक्रवार फार दुर आहे अस वाटायला लागत. आपण चित्रपटाला जाण्याचे प्लॅनज बनवाला लागतो. (अर्थात प्लॅन रद्द होण्यासाठीच असतात)

याला विचारतो, त्याला विचारतो आणि उतसुक्तेची सिमा पार करतो. मग काय चित्रपट रिलीज देखील होतो. कधी तिकीट मिळतं, कधी नाही मिळत. कधी वेळ मिळतो कधी नाही मिळत. कधी प्लॅनज यशस्वी होतात कधी नाही होत, कधी तिकीट परवडत कधी नाही परवडत, कधी कोणीतरी आपलही तिकीट काढत कधी अजुन थोडिशी वाट पहावी लागते. आपण रिव्ह्युज ऐकतो, वाचतो. अहो....
या सगळ्यामध्ये आपल्याला, प्रत्येकालाच एखादा चित्रपट अगदी मनापासुन सिनेमा गृहात जाऊन बघायचा असतो. (मला सगळेच बघायचे असतात)

Image result for film THEATRE

मला नाही चित्रपट घरी बघायला आवडणार, तेही 'first day first show at home'. नको रे बाबा! कलाकारांनी केलेली मेहनत मला चित्रपट गृहात जाऊन अनुभवायला अवडेल, एखाद्या टेक्नॉलॉजी मला नकारायला अवडेल. कारण मग ती सगळी मजा जाईल. ती थिएटरला जाण्याची, पैसे साठवण्याची, पाॅपकॅर्न खाण्याची, एसीमध्ये कुडकुडत चित्रपट बघण्याची, मोठ्या पडद्यावर त्या मोठ्या थिएटर मध्ये आवडत्या अभिनेत्यांना बघण्याची, सुरेख ओठवणी बनवण्याची, पिक्चरमध्ये अनोळखी लोकांसहित विनोदावर हसण्याची, घाबरण्याची, रडण्याची. सगळीच, अगदी सगळीच मजा जाईल.

मला चित्रपटगृहात चित्रपट बघायला जास्त आवडेल, मला त्या चित्रपटाला तो वेळ द्यायला खुप आवडेल. मला आवडेल कधी आनंदी होऊन तर कधी डोळ्यात अश्रु साठवुन चित्रपट गृहाच्या बाहेर पडायला. मला खूप आवडेल. अगदी नेहमी! यापुढेही! मला यासाठी कोणी नाव ठेवले तर मला तेही आवडेल. माफ करा हं, पण मला या तंत्रज्ञानाला नाकारायला आवडेल.  

इतर ब्लॉग्स