शाहूंची पुण्यभूमी आहे ही, एवढ्यात हार मानणार नाही!

कुलभूषण बिरनाळे
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

गेले 10 दिवस माझं गाव पुराच्या विळख्यात अडकलं आहे. सगळे रस्ते अजून पाण्याखाली आहेत, माणंस गावातच अडकून पडली आहेत. शेतातलं उभं पिक कुजून गेलंय, जनावरं उपाशी आहेत. शाळा, मंदिरात आश्रयाला आलेल्या माणसांची तोंड पाहवत नाहीत. त्यांचं घर तरी शाबूत आहे का हे पाहायला सुद्धा जाता येत नाही इतकी विदारक स्थिती आहे. 

माझे दोन वर्गमित्र त्यांच्या चील्या-पिल्यांना आणि म्हाताऱ्या आईवडिलांना घेऊन आमच्या संस्थेत आश्रयाला आलेत हे पाहून फोन केला तर मला त्यांच्याशी बोलताच येईना.
ज्यानं मला घडवलं, अंगा-खांद्यावर खेळवलं, मला वाढवलं तो माझा गाव कोलमडलाय. माझी प्रेमाची, मायेची माणसं कोलमडली आहेत. माझा समृद्ध शिरोळ तालुका आणि कोल्हापूर जिल्हा कोलमडून पडलाय. हे सगळं रोज मोबाईलवर, टीव्हीवर पाहून जीव जळतोय. पुन्हा कसा आणि कधी उभा राहणार आहे याचा विचार केला की भीती वाटायला लागते.

Image may contain: sky, cloud and outdoor

रोज सकाळ-संध्याकाळ घरी फोन करतो, पूरग्रस्तांसाठी काम करत असलेल्या मित्रांना फोन करतो. सगळेच निराश आहेत. तात्पुरता दिलासा देत राहतो. फोन ठेवल्यावर येणाऱ्या निराशेची आता सवय झाली आहे. पुण्यात राहून जेवढं करायचं ते केलं. आता प्रत्यक्ष गावी जायची कधीची ओढ लागली आहे. पण हे पडलेलं सगळं पुन्हा नव्याने उभं करायला सगळ्यांना घेऊन उभं राहायचं आहे हे नक्की ! 

शाहूंची पुण्यभूमी आहे ही आणि त्यांचे संस्कारही आहेत, 
म्हणून तर एवढ्या सहज आम्ही सुद्धा हार मानणार नाही !

इतर ब्लॉग्स