तोच तो छायाचित्रकार!

मृणाल वानखेडे
Monday, 19 August 2019

तो माणुसच असतो आपल्यासारखा, पण तो असतो टिपणारा आणि साठवणारा, आपल्या जगण्याला प्रत्याक क्षणाची जोड देणारा. तोच तो छायाचित्रकार! 
 

कैद झाल्यावरही, ते मुक्त असतात. ते बोलके, ते निरागस, ते अबोल वक्ते असतात. ते त्या क्षणाचे असतात, त्या क्षणाला जोपासणारे असतात. ते छायाचित्र असतात. 

वर्तमानाच्या क्षणात आपण किती टक्के असतो, यावर प्रश्नचिन्ह आहेच. ज्या क्षणात राहाणही आपल्यासाठी शक्य नसत, तो क्षण टिपु शकण या कलेच मला फारच आपरुप वाटत. वेग- वेगळ्या पोज देऊन फोटो काढण सगळ्यांनाच आवडतं, हो मलाही ते फार आवडत. पण आपली छोटी, मोठी प्रत्येक हालचाल टिपणार्‍या त्या फोटोग्राफरच मला फार कैतुक वाटत. आणि आज त्याच्या मानसिकतेला मला हात घालावासा वाटतोय, थोडा त्याच्यासारखा विचार करावासा वाटतोय. त्याच्या त्या तिक्ष्ण नजरेत डोकावुन पहावस वाटतय. त्याच्या कॅमेराच्या लेन्समध्ये वाकुन बघावस वाटतय. कसे टिपतो तो हे सगळे, हे जाणुन घ्यावस वाटतय.

girl

आपण सगळे व्यस्त असतो. कोणी लग्नात मिरवत असत, तर कोणी गणपतीत नाचत असत, कोणाचा वाढदिवस असतो, तर कोणी वाढदिवसाचा केक खात असत, कोणी नाटकात काम करत अतस, तर कोणी त्यांना बक्षीस देत असत, कोणी हसत असत, कोणी रडत असत, कोणी प्रश्न विचारत असत तर कोणी प्रश्नात अडकलेल असत. कोणी मैत्री करत असत, कोणी बंधनात बांधल जात असत, कोणी नव्या बाळाचे नाव ठेवत असत तर कोणी त्याला ग्रॅज्युएट होताना बघत असत. यासगळ्यात तो कॅमेरा घेऊन आपल्या या भावनांना, क्षणांना अमर करत असतो, त्या आपल्यासाठी जिवंत ठेवत असतो. ज्या क्षणात आपण हरवलेले असतो तो त्यात आपल्याला शोधु पहातो. 

bird

तो आपल्याला नेतो निसर्गाच्या खुप जवळ, तो टिपतो त्या निसर्गाची प्रत्येक हाल चाल, प्रत्येक बदल, प्रत्येक झलक. पशु- पक्ष्यांना तो आणतो आपल्या समोर. जे बघायला आपण बाहेर नाही पडत, जे आपण दुर्लक्षीत करतो, जे आपल्या नजरे आड जात ते सगळ तो आपल्या समोर मांडतो. तो या सिमेंटच्या विळख्यात अडकलेल्या माणसाला निसर्गाची आठवण करुन देतो. तो आपल्या सारखा घाबरत नाही, तो थांबत नाही, तो वेळ वाया घालवत नाही, तो जातो कितीही खडकात आणि घणीतही कारण तो सगळ टिपतो, अगदी सगळच. तुझ, माझ, आपलं, त्यांच तो सार टिपतो. 

तो जिवंतच नाहीतर निर्जीवांनाही टिपतो. तो पक्षपाती नसतो. तो सुंदरताही टिपतो, तो त्यातील डागही टिपतो, तो दु;खही टिपतो आणि आनंदही, तो गरिबांच्या भावना टिपतो आणि श्रीमंतांच्याही, तो टिपतो या त्या प्रत्येक जातीलाही आणि मानवजातीलाही तोच टिपतो, तो कटुता टिपतो आणि तो गोडवाही विसरत नाही.

lamp

तो माणुसच असतो आपल्यासारखा, पण तो असतो टिपणारा आणि साठवणारा, आपल्या जगण्याला प्रत्याक क्षणाची जोड देणारा. तोच तो छायाचित्रकार! 
 

इतर ब्लॉग्स