'वेगळेपण' जपताना...

मृणाल वानखेडे
Wednesday, 21 August 2019

"वेगळ्या काही स्वभावाच्या
वेगळ्या काही माणसांच्या
वेगळ्या काही गोष्टींच्या
एक वेगळी, अभिवाचनाची 
संध्या........
वेगळेपणा.... जपतांना..."

"वेगळ्या काही स्वभावाच्या
वेगळ्या काही माणसांच्या
वेगळ्या काही गोष्टींच्या
एक वेगळी, अभिवाचनाची 
संध्या........
वेगळेपणा.... जपतांना..."

वेडी शांतता नांदत होती सभागृहात. थंड वातावरण आणि पोटात खळबळत असणारी उतसुक्ता. कोरी पाटी घेऊन त्या कार्यक्रमात लक्ष गुंतवुन बसले होत. काशाच अभिवाचन होत, विषय नक्की काय या सगळ्यापासुन होता अज्ञातवास. जाण होती, ती अगदी जुजबी जी कीर्यक्रमाच्या पोस्टरवर वाचली होती. 'समीर अंजला महागांवकर यांची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन असलेले, ज्ञान प्रबोधिनीच्या प्रज्ञा मानस संशोधिका निर्मित वेगळेपणा.... जपतांना... एक विनामुल्य प्रवेश असणार अभिवाचन.' या इतक्या माहितीवर कानांना, डोळ्यांना आणि मनालाही रंगमंचावर अगदी ताकिद देऊन गुंतवुन ठेवलं. 

वेगळेपणावर भाष्य करण, हा एक पराक्रमच आहे. कारण वेगळेपणा सहन देखील न होणाऱ्या जगात महागांवकर त्यावर बोलु पहात आहेत. माणसाच्या वेगळेपणावर, त्याच्या स्वभावातील वेगळेपणावर, माणसांच्या आवडितील वेगळेपणावर, त्यांच्या वृत्तीतील वेगळेपणावर, त्यांच्या कामातील वेगळेपणावर आणि वेगळ्या माणसांतील वेगळेपणावर अख्खा कार्यक्रम आयोजिला होता. 

"पालकांना मी सहसा अवडत नाही ,
बदलत जाणाऱ्या गोष्टी तशा त्यांना झेपत नाही"

कित्येक मुलाना हे अस वाटत असत. आपण आहोत वेगळे हे त्यांनाच कळत असत. कित्येक कारणांमुळे त्यांची वागणुक बाकिच्यांपेक्षा जरा वेगळी असते. 'ती सतत वाचत असते, ना जेवणाची शुद्ध ना झोपण्याची. ना शुभकार्यात लक्ष आणि ना.... अस वेड्या सारख बर दिसत का?', 'दुसरीत आहे पण चौथीचे गणित सोडवु पहातो, इतका अभ्यास....?', 'खिळात पुढे, तोंडी सगळ फडा- फडा सांगते पण लिहायच म्हटल की कंटाळ करते.. अस कस चालणार?', 'खुप शांत आहे हा, कोणाशी फारसा बोलत नाही सतत चित्र काढत वसलेला असतो.. शब्दांची गरज भासत नाही का याला?', 'अमेरिकेतच स्थाईक व्हायच म्हणते, तिथे स्वत:चे क्लास चालवते.. पण मग इथला घाट...?' अशी अनेक वेगळी माणस असतात आपल्या 
आजुबाजुला. कदाचित तुम्हीच एक असाल. असेल तुमचा काम तुमच्यासाठी सरवस्व. तुम्ही शांत असाल, खुप शांत असाल, एकटे राहात असाल, दिवस रात्र काम करत असाल, कमी वयात जवाबदार असाल, उंच भरारी घेत असाल; अर्थात या मानवी व्यवस्थेला आव्हान देणारे प्राणी तुम्ही असाल. तर हा वेगळेपणा आपल्या पालकाना, आपल्या मित्राना, नातेवाईकाना न झेपणारा असतो. याच वेगळेपणाच्या गोष्टी महागांवकरांनी मांडल्या, गोष्टी मनात विरघळायला भाग पाडल्या, प्रश्न विचारले आणि त्यांची उत्तरही नकळत दिली.

''माझ सगळ अति,
प्रेम करणं अति,
जीव लवण अति,
मनाला गोष्टी लावून घेण अति 
म्हणून स्वाभाविक रडण ही अति.. 
या अति गोष्टी आहे..
म्हणून का मी वेगळा असतो?"

महागांवकरांच्या या ओळींनी प्रत्येक वेगळ्या माणसाला स्वत:च्या आणखी जवळ नेल. माझ्यातल्या वेगळेपणाला मी आधी ओळखायला हव, मी त्या वेगळेपणाला न दाबता मोकळ सोडायला हव, मी न घाबरता मी जसा आहे तस जगायला हव, रडु येत तर रडायला हव आणि शांत राहायचय तर तसच शांत राहायला हव. मी वेगळा आहे, हे मी स्वीकारायला हव या संकल्पनेच्या कुशीत नेऊन ठेवलं.  

वेगळ्या माणसाना ओळखण्याची गरज आहे, त्यांना त्यांच्या पद्धतीने सांभाळण्याची गरज आहे, त्याना स्वीकारण्याची गरज आहे हे सांगणार अभिवाचन मनात घर करुन गेल. वेगळेपणाला नवी दिशा मिळाली आणि वेगळ्याना एक नवी ओळख. 

"आपले गुण, जेव्हा आपले assets असताना ते कधी कधी liabilities वाटायला लागतात तेव्हा प्रज्ञावंतांचा अंतर्गत, मन आणि बुद्धि यान मध्ये लढा चालू होतो. वेगळेपण जापतना हा एक प्रयत्न आहे प्रज्ञावंतांचा भावविश्वा जाणवून देण्याचा. या प्रयत्नात शहरी आणि ग्रामीण प्रद्न्यावंतांच्या जन्मतः अधिक क्षमतांच व बहरलेल्या कौशल्याचे वर्णन करायचा प्रयास आहे."

-समीर अंजली महागावकर

आणि मग मला वाटला सांगाव प्रत्येक वेगळ्याला. अहो त्याला कळायला हव त्याच्यावर आता बोलल जातय. त्याला समजुन घेतल जातय. त्याच्या मानसिकतेचा अभ्यास केला जातोय. आता घाबरण्याची गरज नाही, ना गरज आहे लपण्याची. आयुष्य फुलवण्याच्या वयात कोणाला मी असा का, हे सांगण्याची गरज संपेल कदाचित. अहो संपली नाही तरी ती कळेल तरी. आज चार लोकाना तर उद्या दहा, पण कळेल यात त्या वेगळ्याचा आनंद नाही का दडलेला.

अहो महागांवकर ...वेगळ्यांसाठी आणि त्यांच्या आजुबाज्यांसाठी 'वेगळेपण....  जपतांना...' घडवा.. आज, उद्या आणि सतत......

इतर ब्लॉग्स