राजे, भाजप 'महाराजांच्या' विचारांवर चालतो तुम्हाला कळायला उशीर झाला...

राजे, भाजप 'महाराजांच्या' विचारांवर चालतो तुम्हाला कळायला उशीर झाला...

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. प्रवेश करताना ते म्हणाले, मोदींच्या विचाराशी सहमत असल्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच भाजप सर्वधर्म समभावाने काम करत आहे. शिवाजी महाराजांचा विचार घेऊन भाजप पुढे जात आहे, त्यामुळे विविध राज्यातून भाजपमध्ये प्रवेश केला जात आहे. प्रत्येक राज्यात होणाऱ्या भाजपाच्या प्रगतीचे कारण म्हणजे मोदी आणि शहा यांचे काम असल्याचेही ते म्हणाले आहेत. हि प्रतिक्रिया ऐकून वाईट वाटलं. कारण कोणताही राजकीय पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर चालतो हे म्हणणे फार धाडसाचे होईल. काही दिवसांपूर्वी हेच राजे भाजपवाले किती वाईट आहेत हे सांगत होते. आज अचानक त्यांना हा साक्षात्कार झाला. 

उदयनराजेंच्या राजकीय कारकिर्दीविषयी बोलायचं झालं तर  "उदयनराजे यांना साताऱ्यात महाराज या नावानं ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज असल्याचा त्यांना अभिमान आहे. त्यांनी दिल्लीत जाऊन आपल्या कामाचा ठसा उमटवावा, असं साताऱ्याच्या जनतेला मनोमन वाटतं. पण उदयनराजेंना त्यात रस नाही. तसं राजकारण करण्याचा आवाकाही त्यांच्याकडे नाही. 

"राष्ट्रवादी पक्षाचं तिकीट मिळवण्यासाठी ते अनेकदा शरद पवारांकडे जात आणि निवडून आल्यानंतर मी माझाच, माझा पक्ष कोणताच नाही, असं म्हणतात. हे कुठलं गांभीर्य आहे. संसदेत ते 10 वर्षं आहेत. या काळात ते किती दिवस हजर राहिले आणि त्यांनी एखादा प्रश्न विचारला का? सातारा जिल्ह्याच्या किती प्रश्नांचा त्यांनी फॉलोअप घेतला, किती प्रश्न व्यापक स्तरावर नेले? सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपमध्ये जात आहे, असं ते म्हणाले. पण, खासदार निधीतून काय काय केलं हे त्यांनी दाखवायला हवं. किंवा मला या गोष्टी करायच्या आहेत, पण सत्तेत नसल्यामुळे त्या होत नाही, हे सांगायला हवं. पण ते तसं करताना दिसत नाहीत," पक्ष किंवा संघटना वाढीसाठी ठोस काही केलंही नाही. 

"उदयनराजे यांच्याविरोधात अनेक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सत्तेच्या विरोधात राहिलं तर कायद्याची टांगती तलवार राहिल, अशी भीतीही त्यांना आहेच. त्यामुळे आता त्यांनी भाजपची वाट धरली आहे. कदाचित अमित शहा यांच्यापुढे ते शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालतात अशी म्हणायची वेळ आली असेल. त्यांचा आतापर्यंतचा पक्षांतराचा  प्रवास बघितल्यास ते भाजपमध्ये किती दिवस टिकतील हे कोणाला ही माहिती नाही. हे झालं राजेंबद्दल. ते जे सांगतात जो पक्ष शिवाजी महारांजाच्या विचारांवर चालतो त्या पक्षाने आजपर्यंत जातीजातींमध्ये वाद लावून आपली राजकीय पोळी भाजली आहे हे इतिहास पाहिल्यानंतर लक्षात येईल. शिवाजी महाराजांच संघर्ष हा कुठल्या जात  व धर्माविरुद्ध  नव्हता तर शिवाजी महाराजांचा संघर्ष हा रयतेसाठी होता.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खरे खुरे रयतेचे राजे होते. राजकीय पक्ष मात्र आपल्या सत्तेसाठी त्यांचा उपयोग करताना दिसत आहेत. आज महाराजांच्याच  मातीत, त्यांच्याच स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराज हा एक राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोगी पडणारे समीकरण ठरत आहेत. शिवरायांच्या नावाने मतपटीत मतांची भीक मागत फिरकत आहेत. मावळ्यानो  शिवाजी महाराज हे राजकीय लढवय्ये नक्कीच होते. परंतु, विशिष्ट एखाद्या पक्षांसाठी मर्यादित नव्हते. हे उदयनराजे विसरले याचे मात्र अतीव दुःख होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com