आमचं नाटक बस.. तं.. य...!

प्रतीक ढवळीकर
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

सुरुवात

साधारण दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. आदित्य आमच्या नाटकाचा दिग्दर्शक, त्याचा मला कॉल आला, "तू पुरुषोत्तम करत आहेस, बाकी तुझं तू बघून घे". आणि माझा रिप्लाय न ऐकताच त्याने फोन कटसुद्धा केला. मला दोन मिनिट काही कळलंच नाही. मला प्रश्न पडला, "हे आत्ता नक्की काय झालं?" तर माझा म्हणजे माॅर्डन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा त्या दिवसापासून ते पुरुषोत्तमच्या प्रयोगापर्यंतचा सगळा प्रवास, मी या ब्लॉगमधून मांडणार आहे. 'जेके'चा 'अवलिया' होण्यापर्यंतचा हा सारा प्रवास आहे.

स्क्रिप्ट ची निवड

सुरुवात

साधारण दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. आदित्य आमच्या नाटकाचा दिग्दर्शक, त्याचा मला कॉल आला, "तू पुरुषोत्तम करत आहेस, बाकी तुझं तू बघून घे". आणि माझा रिप्लाय न ऐकताच त्याने फोन कटसुद्धा केला. मला दोन मिनिट काही कळलंच नाही. मला प्रश्न पडला, "हे आत्ता नक्की काय झालं?" तर माझा म्हणजे माॅर्डन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा त्या दिवसापासून ते पुरुषोत्तमच्या प्रयोगापर्यंतचा सगळा प्रवास, मी या ब्लॉगमधून मांडणार आहे. 'जेके'चा 'अवलिया' होण्यापर्यंतचा हा सारा प्रवास आहे.

स्क्रिप्ट ची निवड

सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा विषय हा असतो, की यावर्षी आपण करायचं काय? आपलं स्क्रिप्ट काय? पण यावर्षी मात्र आमच्याकडे गणित उलट होतं. आमच्याकडे चांगल्या म्हणाव्या अश्या, विद्यार्थी लेखकाने लिहिलेल्या दोन स्क्रिप्ट होत्या. ज्यापैकी एका स्क्रिप्ट वर काम करायचं असं आम्ही पक्क केलं होतं. एवढंच नाही तर त्या स्क्रिप्टचा फायनल ड्राफ्टसुद्धा आमच्या हातात होता. तालमींना आम्ही सुरुवात करणार एवढ्यात आमच्या समोर एक एक दगड येऊन उभे राहायला सुरुवात झाली. आमचा एक मित्र वायडी झाला. ज्यामुळे आम्हाला त्या विषयावर नाटक करता आलं नाही. तर ऐनवेळी सगळं उत्तम सुरू असताना, या कारणामुळे आमची स्क्रिप्टची शोधाशोध परत सुरू झाली. पुरुषोत्तमसाठी स्क्रिप्ट सबमिट करण्याची तारीख होती १९ जुलै आणि १७ जुलै आली तरीही आम्ही स्क्रिप्ट शोधत होतो. आम्ही अगदी गॅस वर होतो आणि स्क्रिप्ट सबमिट करण्याची तारीख जवळ जवळ येत होती. त्यातच अचानक मारुती रायासारखा आमचा वायडी झालेला मित्र आमच्या मदतीला धावला. त्याने आम्हाला काही कथा कथन ऐकायला सांगितले आणि त्यातले काही वपूंची होती आणि त्यात आम्हाला आमच्या एकांकिकेची कथा सापडली "जे के मालवणकर". 

१८ जुलै तारीख उजाडली, कथा कथन हातात होतं. पण त्याचं पुढे काय? खरं तर आदित्य आणि मला दोघांनाही ही कथा खूप भावली होती आणि आवडलीही होती. आम्ही दोघेही यावर ठाम होतो, की हीच कथी करायची पण कसं? नाट्य रूपांतर करायचं की कथेवरून प्रेरित होऊन नवीन कथा लिहायची. हातात एक दिवस पण नाही, काही तास केवळ शिल्लक. या सगळ्या मिळालेल्या वेळात आम्ही दिवस रात्र जागून नवी कोरी एकांकिका लिहून काढली "अवलिया" आणि १९ जुलै ला ती सबमिट केली. तेव्हाकुठे डोक्यावरचं पहिलं ओझं उतरलं किंवा मैलाचा एक दगड आम्ही पार केला. 

Image may contain: 1 person, sitting and night

प्रोसेस बद्दल बोलू काही              

बरं! आता वेळ आली नाटक बसवण्याची, हातात नवीन स्क्रिप्ट होती. खूप काही दिग्दर्शक आणि लेखकांमध्ये घडत होतं. पण आमच्या ५०-६० जणांच्या टीमला मात्र या कशाची काहीच कल्पना आम्ही दिली नव्हती. ते अजूनही याच भ्रमात होते की जुनी जी स्क्रिप्ट आहे ते आपलं नाटक आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्यावर बॉम्ब टाकला की आपलं नाटक बदललेलं आहे आणि आता नवीन नाटक काय आहे हे काही दिवसात तुम्हाला कळेल! साधारण दोन दिवसानंतर आम्ही टीमला ''जेके मालवणकर'' हे कथा कथन ऐकवलं आणि सगळ्यांनी एकदम असा काही प्रतिसाद दिला, की येस! हे काहीतरी खूप खास, साधं, सोपं, सरळ तरीही नवीन असं काहीतरी आहे. मग कामांना असा काही वेग आला की पुढचा आठवडा प्रत्येक जण फक्त कथाकथन ऐकून कथा डोक्यात आणि मनात भिनवत होतं, घोळवत होतं. प्रत्येकाला नाटक तोंडपाठ झालं होतं, प्रत्येक जण नाटकात राहायला आणि जगायला लागला होता. आमच्या नाटकाला गरजेच्या असणाऱ्या प्रॉपर्टी, पात्रांना वेशभूषा, नाटकाला लागणारा सेट, नाटकाचं संगीत या गोष्टी सगळ्या टीमने कथाकथन ऐकून, आम्ही त्यांना काही सांगण्याआधीच आपणहून लिस्ट करून आमच्यासमोर ठेवल्या होत्या. एका दिग्दर्शकाला यापेक्षा आणखीन वेगळं ते काय हवं असतं! त्याची संपूर्ण टीम फक्त त्याच्यावर आणि त्याच्या नाटकावर विश्वास ठेऊन काम करण्यासाठी मेहनत घेत होती आणि मनापासून झटत होती. मला असं वाटतं की जर प्रोसेस चांगली झाली तर त्यातून येणारं प्रॉडक्ट हे उत्कृष्ट ठरतं आणि या प्रोसेस ने ते दाखवून दिलं.

आमचं नाटक बस.. तं.. य...

आमचे सीन्स बसवून झाले. प्रोसेसला गती यायला लागली आणि जसा एकांकिकेचा मूड होता हलका फुलका तसाच हळू हळू नाटक बसू लागल्यावर हॉल वर असणाऱ्या  
आणि हॉल वर बाहेरून येणाऱ्या प्रत्येक माणसाचा मूड पण नाटकासारखा फ्रेश आणि हलका फुलका राहायला लागला. कशाचं टेन्शन नव्हतंच मुळी आम्हाला कारण सगळे जेकेच्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीने नाटक जगत होते. हळूहळू 60-70 पोरांची मेहनत दिसायला लागली, सेट उभा राहायला लागला, संगीत आलं सगळ्या गोष्टी आल्या.

Image may contain: 1 person, sitting, table and indoor

पुरुषोत्तमच्या लॉटचा दिवस आला आणि सगळ्यांना धाक धुक व्हायला लागली. लॉट कधी येतोय, कोणा सोबत कोण येतोय, पण आदित्य आणि मी ठाम होतो. आपला लवकर येणार नाही आणि तसचं झालं लॉट आला २९ ऑगस्टला. पण बॉम्ब टाकणार नाही तो आदित्य कसला! त्याने रंगीत तालीमच्या आधल्या दिवशी सांगितलं सगळ्यांना की उद्या आपली रंगीत तालीम आहे. त्याच झालं असं होतं की सगळ्यांना पुरुषोत्तम करंडक कडून एक रंग ता दिली जाते.  प्रत्येक कॉलेज एक आपली आपली रंगता लावत असत, तशी आमची पुरुषोत्तमची रंग ता आली होती आमच्या प्रयोगाच्या दोन दिवस आधी. तर तेव्हा आम्हाला कळायला वाव मिळणार नव्हता की नाटक कसं होतंय? नाटकात काय कमी आहे? कुठे मागे राहतोय? आणि एका दिवसात काही बदल करणं शक्य नव्हतं. मग आदित्य ने १७ तारखेला सांगितलं की आपली उद्या रंगता आहे. झाली दुसऱ्या दिवशी आमची रंग ता झाली सिनियर आले त्यांनी उपयुक्त बदल सुचवले. काहींनी नाटक बदला असं सांगितल, काहींनी नाटक करू नका असंही सांगितलं! पण प्रत्येकाची मत जाणून घेतल्यानंतर आम्ही परत याच मतावर आलो की आम्हाला हेच नाटक करायचं आहे, पुढे न्यायचं आहे. आम्हाला ज्यांची मत पटली त्यांच्या मतांचा उपयोग आम्ही केला आणि नाटक पुढे बसवत गेलो. अजून जोरात तालसीला सुरुवात केली आणि आदित्य ने नाटकात खूप चांगले आणि सुरेख असे दिग्दर्शकीय बदल केले. त्यामुळे एकांकिका अजून खुलली, बाहेर पर्यंत पोहोचली. हॉल वर दिवसभरात ४-४ तालमी होत होत्या. पोरं मेहनत घ्यायला थकत नव्हती आणि २७ तारखेची रंगीत तालीम झाल्यावर उजाडला तो प्रयोगाचा दिवस.

२९ च्या आधल्या दिवशी रात्री ११ वाजता सगळी १६ ची टीम आदित्यला म्हणत होती, की आम्ही अजून एक तालीम करायला तयार आहोत. जी आमची दिवसातली ५ वी होती आणि आम्ही ८-१० टेक्निकल तालीम केल्या होत्या. एवढा उत्साह प्रयोगाच्या आधल्या दिवशी म्हटल्यावर कुणी आम्हाला हे सांगण्याची गरज नव्हती की उद्याचा प्रयोग कसा होणार आहे! प्रत्येकाला आपलं नाटक स्पर्धेत पुढे जावं असं तर वाटत होतच, पण उद्याच्या प्रयोगानंतर प्रत्येकाला समाधान हवं होतं की हे नाटक, ही एकांकिका, मिळालेलं पात्र, ही प्रोसेस आम्ही जगलो आणि ते तसचं उद्याही जगायचंय. एकांकिका म्हणून लोकांच्या मनात स्थान मिळवायचं आहे जसं वपुंनी मिळवलं आहे.

इतर ब्लॉग्स