पुण्यात रंगला क्लबचरचा 'वाचनोत्सव'!

सई लिमये
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

एक अजनबी हसीना से (आबासाहेब गरवारे महाविद्यालय), इंधन (फर्ग्युसन महावद्यालय) आणि सावज (स. प. महाविद्यालय) ही 3 नाट्यवाचने सादर झाली. 

'वाचनोत्सव 2019' या कार्यक्रमाच्या निमित्ताने 'क्लबचर' या संस्थेचे उद्धाटन झाले. संकेत अनगरकर याने सुरू केलेल्या या संस्थेचा मुख्य हेतू म्हणजे उभरत्या कलाकारांसाठी मंच निर्माण करणे. सगळ्या कलाकारांना एकत्र आणून त्यांच्या कलाकृतींच्या एकत्रित अनुभव प्रेक्षकांना मिळवून देणे हा आहे. 

या हेतूला साजेसा असा हा वाचानोत्सव झाला. यात काव्यवाचन आणि नाट्यवाचन यांचा सामावेश होता. 5 नव्या, उभरत्या कवींनी काव्यवाचनात त्यांच्या विविध ढंगाच्या कविता सादर केल्या. यानंतर 3 विजेत्या नाट्यवाचनांचे सादरीकरण झाले. एक अजनबी हसीना से (आबासाहेब गरवारे महाविद्यालय), इंधन (फर्ग्युसन महावद्यालय) आणि सावज (स. प. महाविद्यालय) ही 3 नाट्यवाचने सादर झाली. 

या 2 तासांत वाचनावर प्रेम करणाऱ्या आणि न करणाऱ्या ही प्रत्येक प्रेक्षकाला वस्तुतः वाचन न करताही वाचनाची रसपूर्ण, परिपूर्ण अनुभूती मिळाली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने इतर अनेक कलाकारांबरोबर कलेची देवाणघेवाण करता आली. हा कार्यक्रम करताना कलाकार म्हणून तर आनंद मिळालाच पण प्रेक्षकांना मिळणारा आनंदही कलाकार म्हणून अनुभवता आला. हेच या कार्यक्रमाचं वेगळेपण होतं असं मला वाटतं.

टॅग्स

इतर ब्लॉग्स