मान्सून परतीचा प्रवास यंदा लांबणार

किरणकुमार जोहरे, भौतिकशास्त्रज्ञ व हवामान अभ्यासक
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

वातावरणातील बदलांमुळे सलग तिसऱ्या वर्षी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला यंदा विलंब झाला आहे.अजून राजस्थानमध्ये पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावत आहेत. महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्येही पावसाचा जोर कमी जास्त होतो आहे. स्थानिक हवामानामुळे विजांच्या कडकडाट आणि दुपार नंतर पाऊस महाराष्ट्रात होत आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार, साधारणत: १ ते ६ सप्टेंबरच्या दरम्यान राजस्थानच्या पश्चिम भागातून परतीच्या मान्सूनला सुरुवात होते. १५ सप्टेंबरपर्यंत राजस्थान, पंजाब, कच्छच्या काही भागातून मान्सून बाहेर पडतो. यानंतर आठवडाभरात महाराष्ट्रातील पाऊस थांबतो.

वातावरणातील बदलांमुळे सलग तिसऱ्या वर्षी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला यंदा विलंब झाला आहे.अजून राजस्थानमध्ये पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावत आहेत. महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्येही पावसाचा जोर कमी जास्त होतो आहे. स्थानिक हवामानामुळे विजांच्या कडकडाट आणि दुपार नंतर पाऊस महाराष्ट्रात होत आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार, साधारणत: १ ते ६ सप्टेंबरच्या दरम्यान राजस्थानच्या पश्चिम भागातून परतीच्या मान्सूनला सुरुवात होते. १५ सप्टेंबरपर्यंत राजस्थान, पंजाब, कच्छच्या काही भागातून मान्सून बाहेर पडतो. यानंतर आठवडाभरात महाराष्ट्रातील पाऊस थांबतो. देशभरातून ३० सप्टेंबरपर्यंत मान्सून माघारी फिरतो. यंदा अनुकूल वातावरणामुळे पावसाने अद्याप विश्रांती घेतलेली नाही. त्यामुळे आयएमडीने मान्सूनची व्याख्या बदलावी. ३० सप्टेंबरला आयएमडीचा अधिकृत मान्सून संपतो. त्यानंतरचा ऑक्टोबरचा होणारा पाऊस हा देखील मान्सून सिझन रेनफॉलमध्ये धरावा अशी मागणी आहे.

परतीचा पाऊस ओळखायचा कसा ? 

राजस्थानच्या पश्चिम भागात सलग पाच दिवस कोरडे हवामान राहिले, हवेतील आर्दता कमी झाली आणि वाऱ्याचा वेग या तीन घटनांवर मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचा निष्कर्ष काढला जातो. साधारणत: १ सप्टेंबरला राजस्थानच्या पश्चिम भागातून हा प्रवास सुरू होतो आणि ३० सप्टेंबरपर्यंत देशातून मान्सून परततो. यानंतर राजस्थानमध्ये मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक वातावरण तयार होईल.

 
 

इतर ब्लॉग्स