पुणे, पाऊस आणि मी...

पुणे, पाऊस आणि मी...

पुण्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. या पावसाचा फटका आणि खरे गांभीर्य कळले ते म्हणजे (काल) बुधवारी. ऑफिसमधून सुटलो साडेदहाच्यादरम्यान आणि घरी जायच्या विचारात होतो. तसा थोडा पाऊसही पडत होताच पण नेहमीसारखं घरी जाऊ असा विचार केला पण तोच (बहुदा) अंगलट आला.

पहिल्यांदा ऑफिसहून निलायम थिएटरच्या मार्गे निघालो आणि पुढे जायचं ठरवलं पण तिथे गेलो तर रस्त्यांना नद्यांचे स्वरूप...गाडीही जात नव्हती आणि जाऊही दिले जात नव्हते...मग काय मार्ग बदलला...मार्ग बदलून लवकर पोहोचू असं वाटलं पण ते तर आणखीनच कठीण झालं...टिळक रोडमार्गे जात असताना तिथंही रस्त्यांवर पाणीच पाणी...पुढे जायचा हा विचार होताच...वेळ लागला पण त्यानंतर स्वारगेट चौकात आलो...तिथं पोहोचल्यावर पाऊस थोडा थांबलेला...मग थोडा दिलासा मिळाला...पण हा दिलासा जास्त काळ काय टिकला नाही...पंचमी हॉटेलला आलो अन् खरा सीन (Scene) सुरु झाला...

रस्तांना नद्यांचे स्वरुप काय असतं आणि कशाला ते म्हणतात ते खऱ्या अर्थाने अनुभवलं...प्रचंड मोठी वाहतूक कोंडी...अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही जाता येत नव्हतं (जाऊही दिलं नव्हतं)...एरव्ही 50-55 स्पीड असलेली माझी गाडी 10-20 याच स्पीडने जात होती...इच्छा तर होती भरपूर फास्ट गाडी चालवून निघायची पण असं करताही येत नव्हतं...याच स्पीडने कशीबशी गाडी आणली वाळवेकर चौकात...पुढच्या रस्त्यावर पाणीच पाणी...मार्ग काढणेही झाले होते कठीण...मग गाडी आहे त्या जागी लावून घरी पायी जायचं ठरवलं...ते सोप्प असेल असं वाटलं पण तेही भयानकच होतं...

पहिल्यांदा वाटलं गुडघाभर पाणी असेल नंतर अनुभवल ते पाणी होतं 3-4 फुटांपर्यंत...मग काय आता काहीही असो पुढचा प्रवास करायचाच...कोणालातरी सोबत घेऊन बोलत-बोलत त्याचा हात पकडतं निघालो पुढं...रस्त्यावरून जात असताना लोकं म्हणत होती धरण फुटलं, चेंबर तुंबलं, नाले फुटलं...मग आणखीन घाबरलो...जी पद्मावती जिथं एरव्ही 1-2 फुटांपर्यंत पाणी नसतं तिथं मात्र पाण्याची पातळी चांगलीच होती...आणि विशेष म्हणजे पोहता येत नसल्याने आणखीनच भीती...तरी कसंबसं ती 'पद्मावती नदी' पारही केली...पायी जात आपला घरचा रस्ता पकडला...तिथं काहीच पाणी नसल्याने मग वाटलं आलो सुखरुप आपल्या 'बालेकिल्ल्या'त...अशा तऱ्हेने पोहोचलो माझ्या घरी रात्री 12 वाजून 39 मिनिटांनी...

(आज गाडी आणायला गेलो पण पेट्रोलची पाईप कापून पेट्रोल केलं होतं 'गुल्ल'!)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com