Happy Birthday Lata Mangeshkar : माझे लतागीत : किसीने अपना बनाके मुझको मुस्कुराना सिखा दिया

सतिश शिंगवेकर
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

" किसीने अपना बनाके मुझको मुस्कुराना सिखा दिया " , " ज्योती कलश छलके " च्या लताच्या एका लकेरीने प्रसन्न सकाळी श्रुती धन्य होतात नि "आजी सोनियाचा दिनु " असं वाटतं. आपलं संपूर्ण भावविश्वच भारुन टाकणारा हा कोकीळ स्वर " सिर्फ एहसास है ये रुहसे महसूस करो " असं आदर्श प्रेम शिकवतो तसंच " कहाँ चला ऐ जोगी जीवनसे तू भागके " असं कर्तव्यही सांगतो. हा स्वरानंद थोडक्यात सांगणं म्हणजे " गागरमें सागर भरणे " आहे.

" सतत अंतर्मुखी नि गंभीर अबोल चेहरा " धाटणीच्या माझ्या आयुष्यात वेळोवेळी हास्याचे प्रसन्न चांदणे पसरवणारे लतागीत आहे, " किसीने अपना बनाके मुझको मुस्कुराना सिखा दिया । " 

एकदा मंगलाने " तेरी आँखोंके सीवा दुनिया में रख्खा क्या है " या गाण्यावरची सुधीरसोबतची माझी चर्चा ऐकली. कॉलेजमध्ये राखी बांधतांना तिने खळखळून हसत विचारलं " काल तुला रस्त्यात गायला लावणारी ती मृगनयना कोण " ? क्वचितच हसणारा मीही त्या खट्याळपणावर हसलो. पुढे अनेक गडगडाटी हसणारे मित्र मिळतांनाही मला नेहमी अंतर्मनात लतास्वर ऐकू यायचे " किसीने अपना बनाके मुझको मुस्कुराना सिखा दिया। अंधेरे घरमें किसीने हँसके चिराग जैसे जला दिया । " 

खळखळून हसणारी शुभांगी जीवनसाथी मिळाली तेव्हांही मी लतास्वरात हसत म्हणालो, " न प्यार देखा न प्यार जाना सुनी थी लेकीन कहानियाँ । जो ख्वाब रातोंमे भी न आया वो दिनमें मुझको दिखा दिया । किसीने ---- ।" 

राजापूरची गंगा असलेले माझे हास्य कन्या 'प्रतिक्षा' च्या दिलखुलास हसण्याने " वो रंग भरते है जिंदगीमें, बदल रहा है मेरा जहाँ | किसीने---| " म्हणत पुढेही खळाळत राहिले.

आता 3 वर्षाची नात 'रुजुला' जेव्हां " खदाखदा हशाचे " म्हणत मला खेळायला ओढून नेते तेव्हांही त्या माझ्या भाग्यसुखावर स्वरलता फुलं उधळते, " कोई सितारे लुटा रहा था, किसीने दामन बिछा दिया । किसीने ---- । " 

स्वरानंदाने आमचं आयुष्य समृध्द करणारा हा नव्वदीचा आनंदघन, चिरायू ठेव ईश्वरा !

इतर ब्लॉग्स