Happy Birthday Lata Mangeshkar : लतादीदींच्या गाण्यामुळे माझी बहीण माझ्यासोबत...

संजीवनी स. लवंगे
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

पण खरंच लता दीदींच्या या दोन गाण्यांमुळे मला नेहमी माझी बहीण आजही माझा सोबत आहे असे वाटते .... दीदी आपल्या अशा या गाण्यांनी माझा खूप आठवणी जपून ठेवल्या आहेत...

दो पल का था 
लग जा गल

लतादीदींच्या या दोन गाण्यांनी माझा मनात नेहमी साठी घर करून ठेवले आहे... या गाण्यांचे बोल कानावर पडताच मला माझा लहान बहिणीची आठवण येते... आजही ती या गाण्याच्या बोलांनी माझी आहे असे वाटते... जी आज या जगात नाही आहे... आज तिला जाऊन सात वर्षे झालीत.

ही आठवण ती दवाखान्यात होती त्या वेळची आहे... ते तिचे शेवटचे दिवस... आम्ही रात्रभर बालपणाचा आठवणी काढल्या आणि असे करत ती रात्र संपली.. दुसऱ्या दिवशी मी माझ्या घराकडे निघाले. पण का माहिती कसा तरी माझ्या तोंडातून अचानक "लग जा गले " हे गाणं निघालं... मी कसं बसं करत स्वतःला अवरलं... पण बसमध्ये जाताना "दो पल का था ख्वाबोका कारवा" हे गाणं माझा कानामध्ये नुसते ऐकू येत होत. 

सलग सात दिवस हे दोन्ही गाणे मला ऐकू येत होते आणि आठव्या दिवशी माझी बहीण गेल्याचा निरोप आला आणि तिथेच सर्व संपल.. या नंतर आम्ही भेटणार नव्हतो.. ती आमची शेवटची भेट... 

पण खरंच लता दीदींच्या या दोन गाण्यांमुळे मला नेहमी माझी बहीण आजही माझा सोबत आहे असे वाटते .... दीदी आपल्या अशा या गाण्यांनी माझा खूप आठवणी जपून ठेवल्या आहेत...

तुमच्या या ९० व्या वाढदिवसा निमित्त तुम्हाला माझा आणि माझा परिवार तर्फे खूप खूप शभेच्छा.....
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते.....

इतर ब्लॉग्स