Happy Birthday Lata Mangeshkar : नैराश्यातून बाहेर काढणाऱ्या लतादीदी...

हर्षवर्धन विसपुते
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

खरंतर लतादीदींच्या गाण्यांचे किस्से सांगायला गेलो तर वही अपूर्ण पडेल अशा या लतादीदींना नव्वदाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 

मी मूळ अमळनेरचा आहे आणि नुकताच अकरावीत प्रवेश घेतला आहे. मला गायला फार आवडते, लतादीदी यांचा तुमच्याप्रमाणेच मी ही एक चाहता आहे.

मला नुकतीच घडलेली गोष्ट शेअर करावीशी वाटते... मला माझ्या दहावीच्या परीक्षेच्या वेळी नैराश्य आले होते परीक्षा चार दिवसांवर आली होती आणि मी पुस्तक पाहिले तर सर्व डोक्यावरून जात होते, पूर्ण दिवस फक्त आणि फक्त रडण्यात घालवले. ती परिस्थिती आठवली की, अजूनही अंगावर काटे येतात. एकीकडे अपेक्षांचा डोंगर तर दुसरीकडेकडे न उमजणारी पुस्तके.. मी पत्त्यासारखा कोसळलो होतो, शेवटी बरं वाटावं म्हणून मी युट्यूब वर गाणी ऐकायला सुरवात केली. सोबत लतादीदींच्या एका गाण्याने मला अक्षरशः नैराश्यातून बाहेर आले ते गाणे म्हणजे ,"एक तू ही भरोसा, एक तू ही सहारा", तेव्हा कमीत कमी वीस वेळा ऐकले असेल आणि मला मार्गही युट्यूब वरूनच सापडला.

माझ्या हातात दोन दिवस होते. मी पुस्तकातले पाठ युट्यूबवरून शिकण्यास सुरवात केली व थोडाथोडका होईना माझा त्या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला. मी दहावीत ७७.६०% गुण मिळवून पास झालो. आता मी अकरावी सायन्सला प्रताप महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि आता अभ्यास वेळेच्या वेळी करण्याची सवयही लाऊन घेतलीय.. खरंतर लतादीदींच्या गाण्यांचे किस्से सांगायला गेलो तर वही अपूर्ण पडेल अशा या लतादीदींना नव्वदाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..  

इतर ब्लॉग्स