Happy Birthday Lata Mangeshkar : लतादीदींचं गाणं उर्जादायी

सीमा कुलकर्णी
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे लतादीदींनी गायलेले पसायदान. जे मला माझ्या श्वासाईतके प्रिय असून उर्जादायी ठरते. लतादीदीच्या नव्वदव्या वाढदिवसाप्रीत्यर्थ माझ्या कोटी कोटी शुभेच्छा. आपली सदैव चाहती.

प्रतिभासंपन्न शास्त्रीय तथा पार्श्वगायिका, चित्रपट अभिनेत्री, लेखिका, संवेदनशील छायाचित्रकार, संगीत तथा चित्रपट दिग्दर्शक, संगीत तपस्वी, लता मंगेशकर एक महान व्यक्ती म्हणून आपणा सर्वांना सुपरिचित आहेत. भारतीय संगीत इतिहासात मंगेशकर कुटुंबियांचे कला क्षेत्रातील योगदान बहुमोल आहे. महाराष्ट्रभूषण, महाराष्ट्ररत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके, भारतरत्न आदी पुरस्कारांनी सन्मानित लताजींनी छत्तीसहून आधिक भारतीय प्रादेशिक तथा परदेशी भाषेतील पन्नास हजारहून आधिक श्रवणीय गीतांची अनमोल देणगी सर्व संगीत रसिकांना बहाल केली आहे. त्यात अधिकतम हिंदी, बंगाली आणि मराठी गाणी प्रामुख्याने आहेत. ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. 

ये मलिक तेरे, रैना बीती जाये, इस मोड से, सजना बरखा बहार, मेरे नयना, सूनरी पवन, तू जहाँ जहाँ चलेगा, पिया तोसे नयना,सावन के झुले पडे, चुपके चुपके चलरी, तुम्ही मेरी मंजिल, पंख होते तो उड ही हिंदी गीते, 'तेरी बिंदीया रे, कहा से आये बदरा, सावन का महिना, झिलमील सीतारोंका ही द्वंद्व गीते तर चल उठ रे मुकुंदा, मोगरा फुलला, रिमझिम झरती, श्रावणात घननीला बरसला, गगन सदन तेजोमय, मावळत्या दिनकरा ही मराठी गीते मला खूप प्रिय आहेत. ईश्वराशी निगडित, धर्म, पंथ, काल या सर्वयांच्या पलीकडे जाऊन, कल्पना सार रूपाने आपला विचार ज्यात त्यांनी मांडला आहे ती प्रार्थना, जी माझ्या मनाला सतत भावते, शांतता देते ते म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे लतादीदींनी गायलेले पसायदान. जे मला माझ्या श्वासाईतके प्रिय असून उर्जादायी ठरते. लतादीदीच्या नव्वदव्या वाढदिवसाप्रीत्यर्थ माझ्या कोटी कोटी शुभेच्छा. आपली सदैव चाहती.

इतर ब्लॉग्स