'अवलिया' प्रयोग, 'अवलिया' दिवस!

प्रतीक ढवळीकर
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

आमच्या पुरुषोत्तमच्या 'अवलिया' या नाटकाची 27 तारखेला रंगीत तालीम झाली आणि 29 तारखेचा तो प्रयोगाचा उत्साह वाढवणारा, उत्कंठावर्धक दिवस उजाडला. पहाटेपासूनच गावात जशी लगबग सुरू होते, तशी सकाळपासूनच हॉलवर गडबड आणि धावपळ सुरू होती. प्रत्येक जण कुठल्यातरी वेगळ्याच धुंदीत वावरत होता, पण ही धुंदी फक्त प्रयोगाचीच होती, हे प्रत्येकाच्या वागण्यातून जाणवत होतं. प्रयोगाच्या आधल्या दिवशीपासूनच सगळ्या टीममध्ये काहीतरी हटके जोश संचारला होता. तो प्रयोगाच्या दिवशीही कायम होता.

आमच्या पुरुषोत्तमच्या 'अवलिया' या नाटकाची 27 तारखेला रंगीत तालीम झाली आणि 29 तारखेचा तो प्रयोगाचा उत्साह वाढवणारा, उत्कंठावर्धक दिवस उजाडला. पहाटेपासूनच गावात जशी लगबग सुरू होते, तशी सकाळपासूनच हॉलवर गडबड आणि धावपळ सुरू होती. प्रत्येक जण कुठल्यातरी वेगळ्याच धुंदीत वावरत होता, पण ही धुंदी फक्त प्रयोगाचीच होती, हे प्रत्येकाच्या वागण्यातून जाणवत होतं. प्रयोगाच्या आधल्या दिवशीपासूनच सगळ्या टीममध्ये काहीतरी हटके जोश संचारला होता. तो प्रयोगाच्या दिवशीही कायम होता.

प्रत्येक डिपार्टमेंट मधली सगळी छोटी-छोटी काम संपत आली होती आणि हळूहळू प्रत्येकाला जाणवायला लागलं होतं की आता प्रयोग जवळ येत आहे. प्रत्येक डिपार्टमेंटची काम हातावेगळी होत होती, एक - एक बॉक्स पॅक करून खाली जायला लागला होता, 10 - 10 जणांकडून चेक केला जात होता. त्याआधी आमचा दिग्दर्शक आदित्य, त्याने 1 शेवटची टेक्निकल तालीम घेतली आणि १६ च्या टीम ला त्याने एकत्र बोलावलं. "चक दे इंडिया" च्या शाहरुख ने जसं त्याच्या टीम ला शेवटच्या 70 मिनिटांच महत्व सांगितलं होतं, तसं त्याने शाहरुख खान सुद्धा लाजला असता अश्या काही पद्धतीने आजच्या दिवसाच महत्त्व सांगितलं आणि माझं दिग्दर्शकाचं खरं काम इथे संपल असं जाहीर केलं पण खरं काम त्याचं इथून पुढे सुरू होणार होतं याची त्याला आणि आम्हालाही कल्पना होती.

आता 'भरत' थेट...
टेम्पो भरून झाला होता, नटराजाची सुंदर, सुबक मूर्ती आमच्या समोर होती, मूर्तीसमोर दिवा लावलेला होता. आम्ही सगळे ६०-७० जण मूर्तीसमोर नतमस्तक होऊन, नटराजाचारणी एकच आशीर्वाद मागत होतो, 'आमचा प्रयोग यशस्वी होवो', नटराजाची आरती झाली, गणपती बाप्पाला नमन केलं आणि मग एकच आवाज सगळीकडे घुमला, 'आवाज कोणाचा?? मॉडर्न कॉलेजचा'. 

सगळ्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारून शुभेच्छा दिल्या, काहीसं संमिश्र वातावरण हॉलमध्ये तयार झालं होतं, काहींचं हे शेवटचं, तर काहींचं हे पहिलं वर्ष आणि नाटक होतं, काहींची 12 वी होती; त्यामुळे त्यांनी फक्त नाटकाची प्रोसेस केली होती, तर काहींची टीममध्ये यायची संधी अगदी थोडक्यात हुकली होती. पण सगळ्या गोष्टी बाजुला ठेऊन प्रत्येकाच्या डोक्यात आणि मनात प्रयोग आणि प्रयोगच एक होता. 

Image may contain: one or more people

प्रयोग
भरतला आमच्या नाटकाचा सेट घेऊन आमचा टेम्पो पोहोचला, मागे मागे सोबत आम्ही सगळे पोहोचलो आणि लागलीच आम्ही सेट उतरवून घेतला. टीमचं रिपोर्टींग केलं, सगळ्यांनी थोडं फार खाऊन घेतलं आणि काहीच वेळात आमचे स्वेट शर्ट आले. स्वेट शर्ट म्हणजे टीम मध्ये असलेल्या आणि नसलेल्या सगळ्यांसाठीच कॉलेजच्या  नावाने माज करत फिरण्याची एक संधी असते, प्रत्येक कॉलेज आपल्या यावर्षीच्या नाटकाच्या नावाने आणि कॉलेजच्या नावाने स्वेट शर्ट छापत असतं. तर आता स्वेट शर्ट आल्यावर सगळ्यांना अजूनच चेव चढला आणि जोश संचारला, सगळे एकत्र थांबले होते आणि कधी एकदा 16 ची टीम नाट्य गृहात आत जात आहे याची सगळे वाट बघत होते आणि तो क्षण आला जेव्हा सगळ्यांनी एकत्र मिळून पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरणार होतं, घेतलेली मेहनत समोर रंगमंचावर सादर केली जाणार होती, चीरिंग चा जोश डॉल्बी आणि डिजे च्या आवाजाला लाजवेल असं वाटत होतं.

पहिलं नाटक झालं, दुसरं आमचं होतं, पडदा वर गेला आणि टाळ्या आणि शिट्ट्या यांच्या प्रतिसादात आमच्या नाटकाचा पहिला सीन भाव खाऊन गेला आणि सीन संपणार एवढ्यात नाट्य गृहाचे लाइट्स गेले आणि सगळीकडे अंधार पसरला, सगळीकडे शांतता...आता काय होईल? काय करायचं? लाइट्स कधी येतील? हे प्रश्न 16 च्या टीम ला स्टेज वर पडले होते आणि आता हे काय करणार? नाटक कुठून सुरू करणार? असे काही प्रश्न प्रेक्षकांना पडले होते आणि सगळेच या विचारात असताना एकदम लाइट्स आले आणि सीनमध्ये असणाऱ्या कलाकारांनी असा काही तो सीन उचलून घेतलं की प्रेक्षकांना असा वाटलं की, लाइट्स जाणं हा आमच्या नाटकाचाच एक भाग आहे आणि टाळ्यांचा जोरदार आवाज नाट्यगृहात घुमला आणि हळूहळू नाटक प्रेक्षकांचा होल्ड घ्यायला लागलं, ग्राफ वर जायला लागला आणि हे कदाचित प्रेक्षकांमधल्या काही "अतिशहाणे प्रेक्षक" जे असतात, त्यांना रूचल नसावं.

त्यांनी प्रयोग चांगला होत आहे हे बघितल्यावर, प्रयोग पाडायला सुरुवात केली, पण शेवटपर्यंत त्यांना ते साध्य झालं नाही आणि प्रयोग हा आऊटस्टँडिंग झाला, कारण प्रयोग करून बाहेर पडल्यावर रसिक प्रेक्षकांकडून आम्हाला जी पोचपावती मिळाली आणि 16 ची टीम बाहेर आल्यावर सगळ्यांनी त्यांच्याभोवती जो काही गलका केला आणि १६ च्या टीम क्या चेहऱ्यावर जे समाधान होतं त्यातच आम्हाला खूप काही मौल्यवान मिळालं होतं आणि त्यापुढे ना स्पर्धा काही होती ना कुठलं पारितोषिक कारण समाधान हे जास्त आणि खूप जास्त महत्त्वाचं होतं आणि ते मिळाल्यावर आणखीन काय हवं? आम्ही सेट भरला आणि हॉल वर आलो आणि त्यानंतर पुढचे 2 तास आम्ही जवळजवळ 100 जणं फक्त नाचत होतो आणि नाचतच होतो कदाचित त्यावेळेस सारेच 'अवलिया'मय झाले होते कायमसाठीच.

इतर ब्लॉग्स