हवामान खात्याने शेतकऱ्यांना तातडीने शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण द्यावे

nashik rain 1.jpg
nashik rain 1.jpg

नैऋत्य मोसमी वारे परततांना परिस्थिती पाहून शेतकरी खरीपाच्या पिकाच्या काढणीला लागतो. तर ईशान्य मोसमी वार्याच्या आधारे रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करतो. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार त्यावर विश्वास ठेवून शेतकरी नियोजन करतो. नेहमी ढोबळ मानाने 1 सप्टेंबरला नैऋत्य मोसमी वार्याच्या परतीचा प्रवास सुरु होतो व 30 सप्टेंबरला म्हणजे साधारणपणे 30 दिवसांनी पुर्ण होतो. मान्सूनचा (नैऋत्य मोसमी) हंगाम हा 1 जूनला सूरू होऊन 30 सप्टेंबरला संपतो अशी पारंपरिक पद्धतीने हवामान खात्याने ठरवून ठेवले आहे. नव्हे तशी मान्सूनची साचेबद्ध व्याख्याच गेली दोन शतकांपेक्षा जास्त वर्षांपासून बनवून टाकली आहे.

यंदा नैऋत्य मोसमी वार्यांचा परतीचा ९ऑक्टोबरला प्रवास सुरू झाला, आणि १६ ऑक्टोबर ला म्हणजे सात दिवसांत संपला असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केले. 7 दिवसात घडलेला हा परतीचा प्रवास नेहमीपेक्षा पाच पट गतीने होत नैऋत्य मान्सून परतला असे आयएमडी ने जाहीर केले. मात्र असे घडण्यासाठी हवेचा दाब, तापमान, आर्द्रतेचे आराखडा आदी नेमक्या कोणत्या परिस्थिती होती या बाबत कोणतेही कारण आयएमडीने दिले नाही. एवढेच नव्हे तर नैऋत्य मान्सून परतला आणि एका दिवसात ईशान्य मान्सून आला असे हवामान खात्याने अधिकृत जाहीर केले, याविषयी देखील असे घडण्यासाठीच्या कारणांचे स्पष्टीकरण न देता हवामान खाते बातम्या प्रसिद्ध करून मोकळे झाले.

मान्सून पॅटर्न बदलल्याने 30 सप्टेंबरला न संपता 9 आॅक्टोबर पर्यंत लांबलेल्या पाऊसाचे नेमके करायचे काय याबाबत कुठलेही धोरण अथवा तजविज हवामान खात्याकडे नाही. यात हवामान खात्याचा 96 टक्के पावसाचा अंदाज खोटा ठरवत यावर्षी 110 टक्के इतका जास्त पाऊस कोसळला आहे. यावर्षी देखील सखल भागात अनेक ठिकाणी ढगफुटी झाल्यात. यामुळे 30 दिवस लागणारा मान्सूनच्या परतीचा प्रवास यंदा 7 दिवसात घडलेला नसतांना देखील तो जाणून बुजून हवामान खात्याने जबरदस्तीने आकडेमोडीत तोडमरोड (मॅन्युपूलेशन) करीत तसा भासविला आहे कि काय असे वाटण्यास वाव आहे. मात्र तशी बनवाबनवी केल्याने शेतकऱ्यांना चुकिचा संदेश जावून त्यांचे शेतीचे नियोजन चूकू शकते. शेतचे नुकसान देखील होऊन त्याचे गंभीर व विपरीत परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. आर्थिक फटका बसल्याने शेतकरी आत्महत्यात देखील कदाचित वाढ होऊ शकते. 

सध्या देशात होणारा पाऊस ईशान्य मॉन्सूनचे होतो आहे असे हवामान खाते सांगते आहे. सोबतच कमीदाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याचा देखील हवाला देते आहे. दिल्ली हरीयाणा आदी उत्तर भारत क्षेत्र, ईशान्य भारत, कोंकण किनार पट्टी, मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात पावस बरसतो आहे. यात मान्सून परतल्याचा हवामान खात्याने वर्तविलेला दावा योग्य कसा हा प्रश्न पडतो ? ईशान्य मान्सून वारे अचानक आपली दिशा बदलून दिल्लीत पाऊस देतात ही गोष्ट कशी काय घडते आहे हे हवामान खात्याने स्पष्ट करायला हवे. मान्सून परतला आहे मग कमी दाबाचे क्षेत्र का निर्माण होत आहेत हे देखील सांगणे गरजेचे आहे.

आयएमडी एक, पण मान्सून दोन

भारतीय हवामान खाते एक अ लै तरी त्यांना एकाचवेळी दोन मान्सून दिसत आहेत, एक परतलेला  व दुसरा परतणारा मान्सून असे एकाच मान्सूनला अधिकारी संबोधत आहेत. देसभर बरसणार्‍या पावसावर नुकतीच हवामान खात्याची दोन विसंगत अधिकृत वक्तव्ये समोर आली आहेत. आयएमडी दिल्ली म्हणते की नैऋत्य मान्सून परतला आहे. तर आयएमडी पुणेचे डॉ अनुपम कश्यपी म्हणताय कि नैऋत्य मान्सूनचा परतीचा पाऊस अजून सुरू आहे म्हणजे नैऋत्य मान्सून पुर्णपणे परतलेला नाही. हि गोष्ट थेट भारतीय हवामान खात्याच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न चिन्ह उभे करते. हवामान खात्याने वैज्ञानिक माहिती सह या सर्व गोष्टींचा खुलासा करावा आणि शेतकरी जनतेला सत्य सांगावे. म्हणजे शेतीचे अचूक नियोजन शक्य होईल. भारतीय हवामानशास्त्र विभाग म्हणजे हवामान खाते आपल्या ला पुन्हा उल्लू बनवित आहे अशी जनतेची भावना होणार नाही. तसेच हवामान खात्यावरील जनतेचा विश्वास यामुळे द्दढ होईल म्हणून हवामान खात्याने तातडीने शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण  द्यावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com