भयंकर पुणेरी प्रवास; स्वारगेटला 6 वाजता अन् हडपसरला पोहचलो साडेअकराला

सचिन कुलकर्णी
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

वरिल सर्व विषयांचा सारांश घेता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही केवळ कडक नियमांची अंमलबजावणी करुन करता येणे शक्य असून, ही ती व्यवस्थित रित्या पाळणे हे कर्तव्यक्षम राहण्यासाठी यात येणाऱ्या सर्व घटकांचाच आहे आणि हेच पुणेरी वाहतूक सक्षम करण्यासाठी मदत करेल. शेवटी म्हण उपयोगाला येतेच, पुणे तिथे काय उणे.

शनिवारी पुणेरी प्रवास हा शहरातील वाहतूक नियंत्रणाच्या कक्षेतून बाहेर गेला. पुणे-सोलापूर रस्त्यावरील वाहतूककोंडीने तर सर्व सामान्यांपासून ते श्रीमंत अगदी सगळेच वेठीस धरले गेले. याचा महाभयंकर अनुभव शनिवारी संध्याकाळी नियमित प्रवास म्हणून असणाऱ्या पुणे ते फलटण-पंढरपूर आला. सेव्हनलव चौक, पुल गेट, रेस कोर्स, भैरोबा नाला, फातिमानगर, राम टेकडी, मगर पट्टा तसेच कॅम्प मार्गे चर्च गेट ते भैरोबा नाला या भागात हा अनुभव घेता आला. पाऊस आणि बेशिस्त वाहतूक यामुळे संपूर्ण पुणे वाहतूक नियंत्रण व्यवस्था कोसळली होती.

घटनाक्रम पुढीलप्रमाणे :
१. स्वारगेट स्थानकातून सायंकाळी 6.20 निघालेली एसटी वरिल दिलेल्या मार्गानुसार हडपसर पोहचण्यासाठी रात्री 11.17 वाजले 
२. सुट्टीचा वार रविवार आणि सोमवार (ता. 21) राज्य सरकार निवडणुकची सुट्टी या मुळे आणि अनपेक्षित कोसळणारा पाऊस, काही ठिकाणी बंद पडलेले सिग्नंल हे सर्वांना पुढे प्रवासावर काय परिणाम करेल याची कोणालाच कल्पनाच नव्हती. 
३. एकत्र लागून येणाऱ्या सुट्टीचा परिणाम वरिल सर्व कारणांमुळे नियमित होतो. 
४. परंतु माझ्या एकुण आठ वर्षांच्या प्रवासातील कालचा अनुभव विलक्षण, विचित्र, अंगावर काटा आणणारा होता. 
५. चालू वर्षात पुणेरी मागील अनेक वर्षेचा सरासरीपेक्षा अती भयंकर पाऊस पडुन सुध्दा या मार्गावरिल वाहतूक कोलमडली नाही. 
६. कोणत्याही प्रकारची कल्पना नसताना पुणे ते हडपसर या मार्गाची वाहतूक संध्याकाळी 6.30 ते रात्री 11.30 पुर्ण पणे बंद होती. स्थानिक माहीतीनुसार हडपसरकडून येणारी वाहतूक ही दुपारी 12.30 पासुन कोलमडली होती. त्या दिशेने येणाऱ्या एसटी संध्याकाळी 5.45 ला पोहचली असे सांगण्यात आले. 
७. दोन दिवस सुट्यांमुळे व आपला मतदाता हक्क बजावण्यात कर्तव्यक्षम राहण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दीला नेहमी प्रमाणे एसटी महामंडळाने कुचंबणापुर्वक म्हणजे जादा गाडय़ा न सोडणे हे कर्तव्य बजावले. 
७. एकत्र लागून येणारी सुट्टीला जादा प्रवासी येण्याचा अंदाज असुन ही एसटी महामंडळ कोणत्याही जादा एसटी नियाेजन केले नाही. अनेक प्रवासी दुपारी 3.30 पासूनच अडकून पडले होते. 
८. वरिल सर्व कारणे ही सामान्य नागरिक जो पीएमपी, एसटी महामंडळ, सार्वजनिक वाहतूक, रिक्षा, उबेर याने प्रवास करतो त्यांनचे अतोनात हाल झाले.  
९. अमर्यादित खाजगी वाहने ज्यांनी श्रीमंत थाटाची कवायत, जड वाहतूकीची वाहने यांच्या शहरातील अनियमित प्रवेश या सोबत असणारे दोन चाकी वाहने यांना जो पुणे शहरातील विकासासाठी दिलेला अधिकार या सर्वांचा परिणाम कारणीभूत ठरला. 
१०. वाहतूक नियंत्रण कक्ष व पोलिस दक्ष नियोजनात अकार्यक्षम ठरले काही ठिकाणी सिग्नल बंद पडुन सोबत त्यांची सोडली आणि त्यामुळे त्याचा फायदा घेणारे काही वाहनचालक लवकर पुढे जाण्याच्या प्रयत्नात मागे वाहतूकीचा बोजवारा वाजवून संपूर्ण वाहतूक ठप्प करण्यात यशस्वी धन्यता मानली.
११. मुंबई, बंगळूर या सारख्या ठिकाणची वाहतूक सुरक्षित वाहतूक नियमानुसार चालते किंवा  प्रयत्न आसतो. सिग्नल पाळणे, दिशादर्शकते नुसार एक लाईनमध्ये वाहनाच्या आकारानुसार जाण्यासाठी प्रयत्न हाच वाहतूक नियोजनबद्ध पध्दतीने करण्यासाठी होत आहे. 

वरिल सर्व विषयांचा सारांश घेता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही केवळ कडक नियमांची अंमलबजावणी करुन करता येणे शक्य असून, ही ती व्यवस्थित रित्या पाळणे हे कर्तव्यक्षम राहण्यासाठी यात येणाऱ्या सर्व घटकांचाच आहे आणि हेच पुणेरी वाहतूक सक्षम करण्यासाठी मदत करेल. शेवटी म्हण उपयोगाला येतेच, पुणे तिथे काय उणे.

इतर ब्लॉग्स