मतदानाचा हक्क इतका का रूजवला जातोय?

मृणाल वानखेडे
Tuesday, 22 October 2019

काल मतदानाचा दिवस होता. सगळ्यांनी सोशल मिडीयावर शाई असलेल्या बोटासहीत सेल्फी काढुन टाकल्या होत्या. "आय वोटेड डीड यु?" असे प्रश्नही विचारले होते. तरीही सकाळी उठुन ऐकायला अस मिळालं की मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. मला इतके स्टेटस पाहुन वाटलं, मतदान चांगलच झालं असणार, पण नाही!

काल मतदानाचा दिवस होता. सगळ्यांनी सोशल मिडीयावर शाई असलेल्या बोटासहीत सेल्फी काढुन टाकल्या होत्या. "आय वोटेड डीड यु?" असे प्रश्नही विचारले होते. तरीही सकाळी उठुन ऐकायला अस मिळालं की मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. मला इतके स्टेटस पाहुन वाटलं, मतदान चांगलच झालं असणार, पण नाही! शाई घरी लावता येत असावी किंवा कदाचित ती शाई कोणाला हवी हवीशी वाटतच नाहीये. कदाचीत माझ्या वयातल्या माझ्या जवळच्या खुप जवळच्या आणि लांबच्या, अनोळखी अशा सगळ्यांना असं वाटतय. म्हणजे मतदान करा, अस खूप लोकं सांगत फिरतात पण का करा हे कोणीच सांगत नाही. एक मतही खूप महत्वाचं आहे, मतदान करत नसाल तर तक्रारही करु नका! तसही कोण तक्रारी करतं, आणि किती तक्रारी ऐकल्या जातात? नोटाचचं बटण दाबायचय तर कशाला केंद्रापर्यंत पाय घासत जायचं? 

लोकं आळशी आहेत, सुट्टीची मजा लुटतात असुच शकत अस काही ठिकाणी. पण ते अस का करतात? का नाही वाटत त्यांना त्यांचं मत महत्वाचं? नोटाची इतकी गरज का भासते? 
रस्त्यावर बेभान गर्दी, टेबल टाकुन बसलेले काही लोकं, ते केंद्र, तिथली गर्दी, बंदोवस्त, धाकदुक, उत्साह प्रत्येकालाच वाटेल हे गरजेचं नाहीये ना? किती लोकांची मतं बदलणार? सगळ्यांना किती दिवस मतदानाचं महत्व समजवणार आणि का? त्यांना कळत असेलच ना! ते दुधखुळे नाहीतच. 

लोकशाही वरचा विश्वास उडालेले निराशा भरपूर नागरिक किंबहुना युवक आहेत. त्यांना त्यांच्या हक्काचं अस्तित्व नाही सापडते. त्यांना प्रश्न पडले आहेत आणि उत्तर देणारं कोणीच नाहीये. त्यांच्या समस्या, त्यांचे विचार, त्यांचे आचार, त्यांच्या संहीता, त्यांचे ध्यास, त्यांची स्वप्न. या सगळ्याचं रुपांतर फक्त मतदानात होतय. अस्तित्व हरवलय या प्रत्येक प्रश्नाचं. उत्तरं यांची हयातच नाही आहेत. का समजवताय त्यांना मतदानाच महत्व? त्यांच्या विचारांवर विचार करुन तर बघा. हेच निवडुन येणार म्हणून मी यांनाच मत दिलं अस म्हणणाऱ्यां पेक्षा ते कित्येक पटीने बरेच असावेत. 

जिथे अनाधिकृत रित्या मतदान होतं त्या मतदानाचं महात्व पटावं तरी कसं? कशाला अपेक्षा जेव्हा अपेक्षा भंग इथे सतत होतात. जिथे नागरिकांच्या समस्या राजकारणाचा भाग आहेत तिथे का कोणी मतदान करावं? जिथे जातीचा वापर राजकारणासाठी होतो तिथे का म्हणुन मतदानाची टक्केवारी उंचवावी? 

मतदान हाच फक्त हक्क नाही आहे जनतेचा, हक्क भरपूर आहेत... मग हाच हक्क का इतका रुजवला जातोय?

इतर ब्लॉग्स