आयुर्विमा, आरोग्यविम्याने करावा गुंतवणुकीचा श्रीगणेशा 

मुकेश चोथानी
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

नाशिक : विमा म्हणजे श्‍वास आणि नाव यातील फरक आणि या काळात आपण आपल्या कुटुंबीयांसाठी केलेली आर्थिक तरतूद म्हणजे "विमा' म्हणावे लागेल. विमा म्हणजे मनुष्य ज्या वेळी जन्माला येतो, त्या वेळी त्याला नाव नसते; परंतु श्‍वास असतो. ज्या वेळी श्‍वास बंद होतो, श्‍वास नसतो त्या वेळी फक्त नाव असते. म्हणून गुंतवणुकीचा श्रीगणेशा नेहमी आयुर्विमा आणि आरोग्यविम्याने करावा. 

नाशिक : विमा म्हणजे श्‍वास आणि नाव यातील फरक आणि या काळात आपण आपल्या कुटुंबीयांसाठी केलेली आर्थिक तरतूद म्हणजे "विमा' म्हणावे लागेल. विमा म्हणजे मनुष्य ज्या वेळी जन्माला येतो, त्या वेळी त्याला नाव नसते; परंतु श्‍वास असतो. ज्या वेळी श्‍वास बंद होतो, श्‍वास नसतो त्या वेळी फक्त नाव असते. म्हणून गुंतवणुकीचा श्रीगणेशा नेहमी आयुर्विमा आणि आरोग्यविम्याने करावा. 

आपण आपले वित्तीय नियोजन, निवृत्ती काळातील पेन्शनची तरतूद, मुलांचे शिक्षण, लग्न, दिव्यांगत्व, अपंगत्व आणि मृत्युपश्‍चात आपल्या कुटुंबीयांचे आर्थिक संरक्षण विम्याद्वारे शक्‍य आहे आणि ते करायलाच हवे. सध्याच्या काळात फक्त सुरक्षा "अथवा' जोखीम, संरक्षण इतका संकुचित अर्थ न घेता आर्थिक नियोजनाच्या दृष्टिकोनातून विमा पॉलिसीचा विचार करायला हवा. विमिा पॉलिसीद्वारे आर्थिक संकटाचा मुकाबला विमा पॉलिसीवर कर्ज काढून करता येऊ शकतो. पॉलिसीवर कर्जाची सोय, उपलब्धता हा विमा व्यवसायात लोकप्रिय प्रकार आहे. विमा पॉलिसीवर कर्ज घेऊनसुद्धा विम्याचे सर्व फायदे घेता येतात. विमा पॉलिसी असल्यास भांडवल बाजारातील तेजी-मंदी याचा त्यावर विपरीत परिणाम होत नाही. 

गुंतवणुकीचा श्रीगणेशा नेहमी आयुर्विमा आणि आरोग्यविम्याने करावा. विमा घेताना आपली जोखीम घेण्याची क्षमता आणि जोखीम घेण्याची इच्छा यातील फरक समजून घ्यायला हवा. गुंतवणूक आणि विमा याची गल्लत आयुर्विम्याचा निर्णय घेताना करू नये, पुढील 10 ते 15 वर्षांत भारतात विम्याची प्रचंड मोठी बाजारपेठ दृष्टिगोचर होईल आणि अतिशय वृद्धिकारक असेल अशा प्रकारचे संशोधन मॉर्गन स्टॅनले आणि अल्फावाइज यांनी ऍस्पिरेशन इंडेक्‍स 2018 च्या अहवालात नमूद केले आहे. भांडवल बाजारात विमा कंपन्यांच्या नोंदी याचे उत्तम उदाहरण ग्रामीण भागात विमा व्यवसायाला प्रचंड संधी आहे. एम्प्लॉईज इन्शुरन्समुळे बहुतांश तरुण विम्याला महत्त्व देत नाही; परंतु वरील संशोधनात्मक अहवाल वाचल्यावर मला पुनश्‍च विमा व्यवसाय करावा, असे वाटायला लागले आहे. 
आयआरडीएनेसुद्धा 26 ऑक्‍टोबर 2018 नंतर मृत्युदावा आणि एकरकमी विमा रक्कम किती असावी यात बदल केला आहे. सरेंडर व्हॅल्यू, पेन्शन प्लॅन, मार्केट लिंक प्रॉडक्‍ट्‌स, पॉलिसी रिव्हायव्हल आणि सेटलमेंट पिरियड यात बदल केले आहेत. आपल्या विमा प्रतिनिधीला विचारल्यास विस्तृत माहिती मिळेल. 
घरच्या लक्ष्मीचे संरक्षण करणे, तिला आर्थिक नुकसानीपासून वाचविणे, तिला विमाकवचाद्वारे आर्थिक सुरक्षा प्रदान करणे, हे तिच्या वडिलांचे आणि जबाबदार पतीचे कर्तव्य आहे. आर्थिकदृष्ट्या विमाकवचाद्वारे तिचा घरात मान राहील व आत्मविश्‍वासही. मुले, नातवंडे तिला मान देतील. तिला विमाकवच देऊन विम्याचे महत्त्व वाढवावे आणि विमा प्रचार व प्रसार करावा. 

(लेखक गुंतवणूक सल्लागार आहेत.) 

इतर ब्लॉग्स